मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

रंजन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... अता उराशी कसा धरावा किरण तरी मी दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो.. तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... मलाच कळते ..नसेच ही वाट ओळखीची ... तरी कशी पावलांस या ओढ लागलेली? पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी.. असाच चकवा मला तरी का छळून गेला? कशास बांधू उगाच त्या आठवांस आता? तयास शब्दात मोकळे मी करुन गेलो.. असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा.. तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो... कुणी तुझे नाव घेतले अन् उदास झालो .. जरी किनारे कितीक आले पुढ्यात माझ्या तरी तयां डावलून मी का निघून आलो?... मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

वाचने 7628 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सर्किट Mon, 09/24/2007 - 22:00
असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा.. तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो... छान. खूप आवडल्या ह्या ओळी. - सर्किट