Skip to main content

विचार

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 18/12/2007 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

खूप काही हरवलं आहे!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 17/12/2007 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 15/12/2007 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! ..१

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 14/12/2007 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की, १) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय? २) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात?

फुकटेगिरी

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 11/12/2007 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो !! आज एक नवीन विषयाला सुरूवात करीत आहोत. विषय सर्व मानवजातीच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे फुकटेगिरी. प्रत्येकाला फुकट मिळालेली गोष्ट आवडत असते. भय्याकडे अ़ख्खी पाणीपुरी खाल्ल्यावर त्याच्याकडून वर एका फुकट पुरीची अपेक्षा असते. गावाला स्वत:च्या बागेत आंब्यांची रास पडली असेल तरी च्या मायला त्या शेजार्‍याच्या झाडावर दगड भिरकवण्यासाठी आमचा हात अजूनही शिवशिवतो. हाच आम्ही जिवंत असल्याचा पुरावा. आता आम्ही कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे आमची फुकटेगिरी इतरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 28/11/2007 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

पांढरपेशी कविता

लेखक ॐकार यांनी रविवार, 25/11/2007 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

फुलराणी...

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 22/11/2007 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
इवलिशी कळी दवांत निजली.. चिंबचिंब भिजली लाजेत थिजली... पाहूनी तिजला भ्रमर सावळा आळवित जाई राग आगळा.... प्रेम तिजवर जडले तयाचे नियम त्याने मोडले जगाचे... रूणझुण त्याची वेड लावती गंधित होई वेडी कळी ती.. लाल गुलाबी रंग कोठला केशरी अबोली अंतरी दाटला... फुलविण्या तिला झपाटला तो सुंदर फूल हे म्हणतो जो तो... राजकुमारी..ती. येई हासत फुलांस त्या मग नेई सोबत... भ्रमराची त्या मग प्रेमकहाणी फुला विना त्या झाली विराणी बागेमधूनी शोधित त्या फुला फिरतो वेडा भ्रमर एकला.. भ्रमर एकला.... - प्राजु.
Taxonomy upgrade extras