मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मजला बघ प्रीत तुझी कळली

रंजन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मजला बघ प्रीत तुझी कळली बघतेस जरी मला तू सखये नयनात छबी दिसते दुसरी... चुकवी नजरेस सदा दडुनी कसली करते लपवा छपवी? छळती तुज त्या जुन्या आठवणी जसे भृंग वनामधुनी सुमना फिरती तुझिया अवती भवती झुरते मुखकमल तुझे रमणी कथिले गुज मी तुजला मनचे म्हणुनी झुकला सखये चरणी पडले पुढती किति मौक्तिकही.... अपुल्या पुढती बघता हसली वळुनी सखया झटकन वदली .... 'मजला बघ प्रीत तुझी कळली'

वाचने 4333 वाचनखूण प्रतिक्रिया 1

राजे Wed, 09/26/2007 - 20:58
"छळती तुज त्या जुन्या आठवणी जसे भृंग वनामधुनी सुमना फिरती तुझिया अवती भवती झुरते मुखकमल तुझे रमणी " जबरदस्त..... राजे (*हेच राज जैन आहेत)