काचेची बरणी आणि २ कप चहा
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.
तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पूर्ण भरून निघाली. विद्यार्थांमध्ये एकच हशा पिकला.
तो संपताच सर म्हणाले," आता ही जी बरणी आहे तिला तुमचं आयुष्य समजा. पिंगपाँगचे बॉल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं,आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या अश्या गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य़ परिपूर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी घर आणि कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी. "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड- खडे यांच्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची.तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी महत्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या. "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडीकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकाऊ वस्तुंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल. "पिंगपाँगच्या बॉलची काळजी आधी घ्या त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं हे ठरवून ठेवा बाकी सगळी वाळू आहे." सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं ,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले नि म्हणाले ," बरं झालं तू विचारलंस. तुझ्या प्रश्नाचा अर्थच असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर एक -दोन कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते."
----------------------------------------------------------------------
आंतरजालात विरोपाने प्राप्त झालेली ही कथा आहे. - नीलकांत
वाचने
16255
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
बोधकथा
In reply to बोधकथा by प्रकाश घाटपांडे
विद्वान
हो..
बियर
In reply to बियर by सन्जोप राव
हा हा हा
In reply to हा हा हा by कोलबेर
चहा, बियर व
In reply to चहा, बियर व by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)
चहा आणि मद्य
In reply to चहा आणि मद्य by धनंजय
भाऊ
In reply to भाऊ by राजे (verified= न पडताळणी केलेला)
नाही - पण कुठल्याही वसतीगृहावर होत असतील
पटले..
पूर्ण आयुष्याचं सार एका काचेच्या बरणीत चपखल बसलय!!
खुलासा..
वा... जीवनाचा संपुर्ण सार
हम्म! किती जरी व्यस्त असलं
बोधकथा
In reply to बोधकथा by तिमा
आयला