मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

इस्रोचे अभिनंदन

पाषाणभेद ·
इस्रोचे अभिनंदन काल ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविलल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) अभिनंदन. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण झाले. ओशनसॅट-२ उपग्रहाबरोबरच जर्मनीचे चार छोटे उपग्रह, तुर्कीचा एक व स्वित्र्झलडचा एक असे एकूण सहा उपग्रह अवकाशात एकाचवेळी सोडले गेले. एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाचवेळी दहा उपग्रह एकाचवेळी सोडून एक जागतिक विक्रम केलेला आहे. इस्रोचे पुन्हा एकादा अभिनंदन! (सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. )

ब्लॉग माझा - स्पर्धा

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील वर्षी प्रमाणे यंदा ही स्टार माझा वृत्त वाहिनीने 'मराठी ब्लॉग स्पर्धा 'आयोजीत केली आहे. स्पर्धॅत भाग घेण्याची अंतीम मुदत ३० सप्टेंबर आहे. अधिक माहिती इथे पाहता येईल मागच्या वेळेला अनेक मिपाकरांना पारितोषीके मिळाली होती. यात भारता बाहेरील मिपाकर ही होते. अनेक मिपाकरांचे स्वत:चे खुप सुंदर ब्लॉग आहेत. त्यांना ही एक चांगली संधी आहे.

आशाताईंना ७७व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

sujay ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
८ सप्टेंबर, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताईंचा ७७ वा वाढदिवस, त्यांना मिपा परीवारा तर्फे "वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" ह्या आवाजावर आपल्या सारख्या रसिकांनी निस्सीम प्रेम केलयं आणी करत राहू. आशाताईंची तब्येत अशीच ठणठणीत राहो व त्या शतायुषि होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना .

मी पाहिलेले प्रायोगिक नाटक.

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
माझं नाव ‍र्‍होअन तोंड्वळकर... मी नरवीर कोंडाजी शिरुडे विद्यालयात पाचवीत शिकतो. आमच्या शाळेला काहीजण नकोशि शाळा असे म्हणतात. ते खरेही आहे. मला नाटक पहायला फ़ार आवडते. भरत जाधव आणि प्रशांत दामले मला आवडतात. सही रे सही आणि एका लग्नाची गोष्ट मी ४ वेळा पाहिलं आहे. मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना? माझे निबंध खूप छान होतात, असं सगळे म्हणतात. मी खूप वाचन करतो. सकाळ म.टा. लोकसत्ता पुढारी लोकमत संध्यानंद केसरी तरूण भारत इतके पेपर वाचतो.

मिपाचा दुसरा वर्धापन दिन....

तात्या अभ्यंकर ·
लेखनविषय:
राम राम मंडळी, उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, अर्थात गणेश चतुर्थी...! लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत.. आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना.. सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा!

बैलपोळ्याच्या शुभेच्छा !!

लिखाळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रामराम मंडळी ! आज बैलपोळा ! सर्व नवरोंबांसाठी आज धुणी-भांडी, केर-वारे या पासून विश्रांतीचा दिवस. मस्त पुरणपोळी खाऊन लोळत पडण्याचा दिवस ;) समस्तांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा :) आज आपण दिवस कसा घालवणार ते (सांगण्यासारखे असेल ;) तर) सांगा. आणि बैलपोळ्याला बैलाला सजवतात तर आपण काही खास नट्टापट्टा केला असेल तर ते सुद्धा सांगावे :) --लिखाळोबा

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.

मेघना माझी बहीण..

विसोबा खेचर ·
परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं. मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच. मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच! मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली.