Skip to main content

शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 01/05/2010 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिन चिरायू होवो! आजच कामगार दिन ही आहे. कामगार दिनाच्याही शुभेच्छा! महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे. मराठी जनता कष्ट करणारी आहे हे अध्यारूत होते.

वेलडन प्राजु!!!!!!

लेखक रानी १३ यांनी सोमवार, 26/04/2010 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.124/esakal/20100426/5294049976436762087.htm आधीची बातमी काही अंशी खरी होती.. मात्र त्यात काही चुकीची माहिती दिली गेल्याने, मी या सुधारीत बातमीचा दुवा इथे देत आहे. -(प्राजक्ता)

आमच्या तेंडल्याचा वाढदिवस !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/04/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे !

पुन्हा एकदा लढत ६४ घरांच्या विश्वविजेतेपदाची!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/04/2010 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख २० एप्रिल २०१०. तब्बल ४० तासांचा थकवणारा प्रवास करुन विश्वनाथन आनंद बायको अरुणा समवेत अखेर एकदाचा बल्गेरियाची राजधानी सोफियाला पोचला आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला! आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तो फ्रँकफर्टला चार दिवस अडकून पडला होता आणि शेवटी त्याला गाडीने जावे लागले. तो आणि त्याचा आव्हानवीर बल्गेरियाचा वेसेलीन टोपालोव ह्यांच्यातला विश्वविजेतेपदाचा सामना २३ एप्रिलला सुरु होतोय.

तीन झुरळांचं शुभेच्छापत्र!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 31/03/2010 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रीण एक हरहुन्नरी कलावंत आहे. तिच्याचसारखी तिची पाच वर्षांची मुलगीदेखील मनस्वी, कलासंपन्न व आनंदी स्वभावाची आहे. मैत्रिणीला नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबविण्यात, त्यांना आकार देण्यात समाधान मिळते. तिची लेक तिच्यापेक्षा कलेत एक पाऊल पुढेच आहे. खेळकर, दंगेखोर, खट्याळ, कल्पक आणि मनस्वी!! आजूबाजूच्या जगाचे तरल निरीक्षण तिच्या चित्रांत पाहायला मिळते. पण त्याविषयी बोलायची तिची तयारी नसते बरं का! तुम्ही तिला त्या चित्राबद्दल विचारलंत की ती तुमच्या हातून सटकून पसार होते. परवा ह्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला.

!!!! गुढीपाडवा!!!!

लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 16/03/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा,,,, आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!! ही आमची साधीसुधी गुढी,,,,,, परदेशात सण साजरा करण्याचा प्रयत्नच म्हणाना!!!!

'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/02/2010 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन. तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

मी संपादक झालो तर ?

लेखक टारझन यांनी शनिवार, 20/02/2010 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्‍याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन. तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी . आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे १. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा २. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ? ३. मी संपादक झालो तर ? ४.

सुहास शिरवळकर ह्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 30/01/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
' सुहास शिरवळकर असे आणि तसे ' संपादक :अनिल किणीकर प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन प्रकाशन हस्ते : श्री. द.मा. मिरासदार , श्री. ह्. मो. मराठे दिनांकः ७ फेब्रुवारी २०१०, सायं ६ वा. स्थळः पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे. सुहास शिरवळकर यांचा निधनानंतर असा जाहीर कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. ग्रंथात, चित्रपट, कला , साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. फॅन, कुटुंबीय यांनी शिरवळकर यांचावर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून लेख लिहले आहेत. प्रकाशनाच्या दिवशी सु.शि.

कातरवेळ

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 21/01/2010 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने त्या शुक्रवारी मी जरा लवकरच घरी आलो होतो अन इंग्रजी चित्रपटाची सीडी लावुन बसलो होतो. कुशीत गोटु झोपला होता. अन रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला फोन घणघणला. सहसा माझ्या कार्यालयीन कामाचे फोन भ्रमणध्वनीवरच येतात त्यामुळे लॅन्डलाइनवरचा फोन बहिणीचा किंवा भावाचा असेल असा अंदाज करत मी उचलला. "अरे आईला संध्याकाळपासुन चक्कर येतीये. डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही तर ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांनी ब्लडप्रेशरची गोळी घ्यायला सांगीतल होत अन ती गोळी तासाभरापुर्वी घेतली तरी अजुन चक्कर येतेच आहे," ठाण्याहुन बहिण बोलत होती.