Skip to main content

मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

लेखक limbutimbu यांनी बुधवार, 15/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.

मी हिन्दुस्तान मोटर्स लिमिटेड द्वारा आयोजित ग्रेट ड्रायव्हिन्ग चॅलेन्जमधे सहभाग घेतो आहे. निवडलेल्या स्पर्धकाने १० दिवसात ३००० किमी चा प्रवास जोडीने (कपल) करणे असे प्राथमिक स्वरुप आहे. स्पर्धकान्ची आवेदनपत्रे इन्टरनेटवरुन मागवलेली आहेत
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, पहिल्या १०० जणात निवड होण्यासाठी मला तुमच्या मतान्ची आवश्यकता आहे! १७ जुलै मतदानाची शेवटची तारीख आहे
तुम्ही फक्त इतकेच करायचे

भागवत सर

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 06/07/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.

(विनंती- सध्या कॉलेजची परिक्षा सुरु असलेने लेख जरा गडबडीत लिहिला आहे,समजुन घ्यावे ही विनंती.)

प्रिय अन्वयराव,

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 23/06/2009 08:15 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

आपले मिपाकर अन्वयराव ह्यांच्या छोटेखानी लेखाला हे आमचे छोटेखानी उत्तर! हे उत्तर ह्या स्वतंत्र लेखातून आणि वेगळेपणाने द्यायची कारणे तीन!

१) आज बर्‍याच दिवसांनी एखाद्या लेखाला चार ओळींचे उत्तर देण्यास टाईम भेटला. एरवी, 'वा!', 'सुंदर!', 'छान!' या पलिकडे काही उत्तर द्यायला इच्छा असूनही टाईम भेटत नाही.

२) अन्वयरावांनी एका बापाच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. आम्ही ह्या उत्तराद्वारे एका लेकाच्या भावना मांडत आहोत!

जॉनी मेरा नाम...

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 18/06/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.


उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००)
डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००)
त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की. ( १८३/२००)

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

लेखक गुळांबा यांनी शनिवार, 13/06/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

लेखन प्रेरणा - तुम्ही मराठीसाठी काय करता ?

मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो.

(पुढिल सर्व कल्पना पुर्णत: काल्पनिक)

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.

अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 16/05/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.

जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो.

आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे..

'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे! :)

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक सँडी यांनी शुक्रवार, 15/05/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.


म.टा.चित्र.

हिंदी सिनेसृष्टीवर ९० च्या दशकात अधिराज्य गाजवणा-या 'लाखो दिलांची धडकन' माधुरीचा आज ४२ वा वाढदिवस!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!