शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या