शर्त - The Challenge

लेखनविषय:
लेखनप्रकार
हा चित्रपट पाहताना बाजूला काढून ठेवलेल्या डोक्यात आलेले विचार.... ष्टॅट... हीरो रागाने बघतोय असा पोस्टर म्हणजे अ‍ॅक्शन पॅक्ड वगैरे पिक्चर असावा. बघू. काही गुंड, अतिरेकी वाटणारे लोक कोठेतरी बॉम्ब फोडायच्या तयारीत आहेत. पण स्क्रीन वर एक नुस्ताच बूट दिसतो जाड सोल वाला , मग एक पिस्तूल 'क्लिक' होते. आणि कमांडो च्या वेषातील काही लोक तिकडे जाताना दिसतात व एक एक करून ते गुंड मारले जातात. लगेच एक स्टेज, रॉक स्टार च्या पोज मधे कोणीतरी उभा. हजारो प्रेक्षक दोन्ही हात (लोकल च्या डब्यांना जसे 'चौकट' आकारात वरच्या वायरींना जोडणारे पेंटोग्राफ असतात तसे) वरती जोडून डोलतायत.

मेड इन चायना-एक समिक्षण

लेखनविषय:
लेखनप्रकार
"मेड इन चायना" बद्दल बरेच एकून होतो. म्हणून काल हा सिनेमा पाहिला. एस. ई. झेड. आणि त्या भोवती चालणारी राजकिय चाके हि मध्यवर्ती कल्पना सिनेमा मध्ये वापरली आहे. आप्पासाहेब जगदाळे हे राजकिय वर्तूळात दबदबा असणारं व्यक्तिमत्व. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळी चाकं पुण्यातील पिंपळगाव मधील आपल्या वाड्यात बसून चालवणारी व्यक्ती. त्यांचा पुतण्या मोहीत जगदाळे हा इस्रायल मध्ये जाऊन शेती संबधी उच्च शिक्षण घेऊन आलेला. परदेशी शिक्षण घेऊन परत आल्या नंतर जगदाळे घराण्याची कित्येक एकर जमीनीचा वापर तुला पाहिजे तसा कर असा सल्ला आप्पासाहेब मोहितला देतात.

(आज तुझा वाढदिवस )

लेखनविषय:
लेखनप्रकार
निखिल देशपांडे ह्यांची ही कथा वाचल्यावर असेच मनात आले जर निखिल च्या जागी मी असतो तर कशी लिहली असती ही कथा, निखिल देशपांडे ह्यांची परवानगी घेऊन मी ही त्याची कथा परत लिहीली आहे माझ्या शब्दात. _________________________________________________ आज तिचा वाढदिवस......... काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्री घेतलेल्या एक्स्ट्रा पॅग मुळे उठण्यासाठीच उशीर झाला

फ्रॉस्ट्/निक्सन

लेखनविषय:
लेखनप्रकार
फ्रॉस्ट्/निक्सन हा यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक. यावेळी अगदी ठरवून सगळे ऑस्कर नामांकीत चित्रपट एक एक करुन पाहिले. ( अर्थात चित्रपट एक एक करुनच पाहतात...एकदम सगळे कुणी नाही पाहतं कारण ठसका लागतो.. जमल्यास ह.घ्या. न जमल्यास असो.) फ्रॉस्ट्/निक्सन बद्द्ल मी बरेच गैरसमज करुन घेतले होते. प्रोमो पाहून ही कोण्या एका फ्रॉस्ट् ने निक्सनच्या घेतलेल्या मुलाखतीची एक डॉक्युमेंटरी असावी असा आपला मी एक पूर्वग्रह करुन घेतला होता. निक्सनच्या वॉटरगेट प्रकरणाबाबतचे माझे (अ)ज्ञानही राजकारणी लोकांनी केलेला एक झोलझाल इतपतच मर्यादित होते.

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा

लेखनविषय:
काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी. एव्हडेच काय स्वता: समिक्षकांना सुद्धा त्यांच्या समिक्षेबद्दल सांगता येणार नाही की, हेच काय ते व्यक्त कराचे होते का ?. केंव्हाही समिक्षकाच्या भुमिकेत शिरून हवी तेव्हडी ओढाताण करून तर्क वितर्क माडणारे बरेच असुशकतील पण विषयाच्या केंद्रबिंदू पासून क्षितीजापर्यंत परीघ ओढ्ण्याची प्रतिभा फार थोड्या जाणकारांना लाभली आहे. असे जाणकार समिक्षक कधिही 'समिक्षकाच्या' क्रुत्रीम व रुक्ष मुखवट्याआड लपत नाही म्हणूनच त्यांना एखाद्या ललित,काव्य,लेखनाचा वा कलाक्रुतीचा निख्खळ आनंद घेता योतो व व्यक्त करता येतो.

पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"

लेखनविषय:
लेखनप्रकार
"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच... ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली...

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते. एवढे काय आहे ह्या पुस्तकात ?

शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.

लेखनविषय:
लेखनप्रकार
शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या
Subscribe to समीक्षा