नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे.
आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाच्या वाचनाची सुरूवात कथांपासूनच झाली असेल. याला कारण म्हणजे, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकांतील धडे. या धड्यांमध्ये मातब्बर लेखकांच्या छोट्या कथा असत/असतात. पुस्तक घरी आलं की सगळ्यात आधी पुस्तकाचा वास घ्यायचा आणि वेष्टणं पण घालायच्या आधी सगळे धडे वाचून टाकायचे असं केल्याचे कित्येकांना आठवत असेल. आपल्यापैकी कित्येकांची प्रेमचंद, दि. बा.