गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-१
लेखनविषय:
- Read more about गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-१
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे
- Read more about हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे
- 112 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.
स्नेहसंमेलने.
- Read more about स्नेहसंमेलने.
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
लहानपण दे रे देवा असे काहीसे आपण नेहमीच म्हणतो. अशा लहानपणाच्या आनंदाचा उत्कर्ष आपापल्या स्नेहसंमेलनात होत असतो. लहानपणी याला विविधगुणदर्शन असेही म्हणत असत.
आज माझ्या मुलीच्या स्नेहसंमेलनात जाण्याचा योग आला. पूर्वी कार्यक्रमाला सूत्र असे नसायचे. आजचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्र या कल्पनेभोवती विणला होता.
गणेशवंदना, कोळी नृत्य, ज्ञानेश्वर-चांगदेव संवादाचे नाट्यकरण, गणपती मिरवणूक, वासुदेव, जात्यावरच्या ओव्या आणि शिवराज्याभिषेक असा सर्वांग सुंदर कार्यक्रम होता.
सर्वसाधारण नाताळाच्या १ ते १ १/२ महिने अगोदर स्नेहसंमेलनाची तयारी सुरु होते.
बंगालच्या वाघिणी
- Read more about बंगालच्या वाघिणी
- 106 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले.
सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले.
लवंगलता एक प्रयत्न
Taxonomy upgrade extras
- Read more about लवंगलता एक प्रयत्न
- Log in or register to post comments
गुरुवर्य धोंडोपंतांच्या लवंगलता छंदातिल रचना वाचुन खरच येड लागले.
म्हणलं आपण पण एक प्रयत्न करावा (ग्रुहपाठ #:S अनुष्टभ फारच जड आहे)
माझा हा एक प्रयत्न जाणकारांनी चुका किंवा बदल जरुर सुचवावेत.
दर्शनाने गणेशाच्या,
मन होई शांत |
राहो तुझी क्रुपाद्रुष्टी,
अनादि अनंत ||
प्रसन्न ही तुझी मुद्रा,
मन आनंदते |
पाणिदार डोळ्यांमध्ये,
भान हरपते ||
आगमन होता तुझे,
घरी सणवार |
ढोलताशे गजरात,
चैतन्य अपार ||
लाल फुले जास्वंदीची,
माथ्यावर दुर्वा |
विघ्नहर्ता गणेशा तू,
बुध्दी देइ सर्वा ||
आरती तुझी गाईन,
पूर्ण मनोभावे |
सुख येथेही नांदते,
तुझ्या क्रुपाभावे ||
फुल, केवडा अर्पुन,
भ
दिलखुलास
लेखनप्रकार
- Read more about दिलखुलास
- 23 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला!
शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे.
अगदी पहिली फेरी हिंदी गाण्यांची होती.
जाणिजे यज्ञकर्म..!
- Read more about जाणिजे यज्ञकर्म..!
- 74 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
राम राम मंडळी,
आपले एक मिपाकर मित्र प्रभाकर पेठकर यांचे आजपासून पुण्यात 'यज्ञकर्म' हे हॉटेल नव्यानेच सुरू झाले आहे..
आपल्या सर्व मिपा परिवारातर्फे मी पेठकरशेठना आणि त्यान्च्या 'यज्ञकर्म' ला मनापासून शुभेच्छा देतो. यज्ञकर्मची खूप भरभराट व्हावी हीच शुभेच्छा... एक मराठी माणूस या नात्याने मिपा या मराठी संकेतस्थळाला पेठकरांचा खूप अभिमान वाटतो..!
पेठकरशेठ, आपल्या यज्ञकर्मकरता हे एक लहानसं शुभेच्छापत्र - :)
तात्या.
तात्या.गदर संस्थापकाची १२४ वी जयंती
लेखनविषय:
- Read more about गदर संस्थापकाची १२४ वी जयंती
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे याम्ची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष!
डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले.
डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले.रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब
- Read more about रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे.
सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे.