Skip to main content

प्रतिसाद

मतदार हुशार झालेत का ?

लेखक विवेक9420 यांनी शुक्रवार, 28/02/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

छपाकसे पेहेचान ले गया...

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 13/01/2020 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

लेखक पहाटवारा यांनी शुक्रवार, 20/12/2019 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

संध्याकाळचा पेग ..

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 28/08/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचा पेग .. जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा .... फक्त अर्धा पाऊण तास!...

'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 30/07/2019 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

शतजन्म शोधितांना....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.

औरंगजेबाच्या (शिल्लक) सहिष्णूतेचे रहस्य

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/05/2019 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाने शिरच्छेद केलेल्या सरमद कशिद बद्दल लिहिलेल्या प्रतिसादात, मध्ययुगीन (छ. शिवाजी कालीन) इतिहासाचे अभ्यासक मनो यांचाही अनुषंगिक विषयावर बर्‍यापैकी समतोल प्रतिसाद आला.