Skip to main content

प्रतिभा

(गंधांच्या उलाढाली)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/02/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा भूषण कटककर ह्यांची गजल 'गंधांच्या उलाढाली' जरा 'टाकून' बसलो तर बला कळवायला आली तिच्या पक्षातल्या आंबूस गंधांच्या उलाढाली! तिला जे पाहिजे नेले विदेशी ते तिने सारे मला बसवून 'देशीशी' तिला साली मजा आली! इथे येतात ते करण्यास गझला आणि कविताही चला मारून फाट्यावर निघावे खालच्याखाली! मिळावे रातच्याला हरितकी अन ऊन पाणीही तसा मी उगवता वदतो, चला झाली, चला झाली! गमन करण्या निघालो मी, हिच्यापाशी कसा आलो? बरे नाही मिळाले पद्य की मी वाकडा चाली! पुरेसे मोडके केव्हाच झाले गीत हे बाळा करावी वाटता, गझलेस 'रंग्या' मोडता घाली! चतुरंग

अमृतराय झोपडीत का गेला?

लेखक चतुरंग यांनी रविवार, 08/02/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली. 'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले. ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्‍या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले. ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो!

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

((प्रवाह..आणि उत्तर))

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/02/2009 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची "प्रवाह..आणि उत्तर" वाचली आणि लगोलग विडंबनाचे प्रवाही उत्तर स्फुरले ते असे.. काव्य अनावृत्त मात्रा आणि वृत्त शिष्य हा प्रवृत्त झाला पहा कविबुद्धी नाठी हाणावीच काठी विडंबना साठी लगोलग 'धुकट सकाळ' फुकता 'फुकट' 'चिकट' बिकट' होत जाई तोतयांचे बंड विचारती गुंड 'चतुरंग' पुंड गेला कोठे? कविता 'म्हणजे' वाघाचे हो पंजे कशाला पाहिजे वृत्त छंद विसरा 'खोबार' 'शाळा' झाली फार प्यावा थंडगार सोमरस काव्य 'हलकट' करी खटपट नाना पाठोपाठ अवलिया आवडती नार आहे 'बुधवार' टाकावी चिक्कार सायंकाळी कवी किती जण? कवितांचे तण उपटण्या मन आतुरले 'केसूपंथी' खाज व

कोल्हे-कुई

लेखक पुष्कर यांनी बुधवार, 04/02/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.

थोडे काही जुनेपुराणे, ठेवणीतले..! (१)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 03/02/2009 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, भारतीय अभिजात संगीताची गेल्या २५ वर्षांहून अधिक श्रवणभक्ति केली, आजही करतो आहे, जमेल तसं शिकतो आहे. अनेक दिग्गजांना अगदी कान तृप्त होईस्तोवर ऐकलं, अनेकांचा सहवास लाभला. आणि या सगळ्या श्रवणयात्रेत अनेक अश्या अनमोल ध्वनिमुद्रणांचा एक लहानसा खजिना गोळा केला, जो कितीही पैसे ओतले तरी बाजारात विकत मिळणार नाही. त्यापैकीच काही ध्वनिमुद्रणांची झलक आपल्याकरता उपलब्ध करणार आहे, त्यावर दोन शब्द बोलणार आहे.. पं गोविंदराव पटवर्धन! बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार!