तुझे आगमन
आज तु जेंव्हा येशील
सुर्य तुला लाजलेला असेल
चंद्र खट्याळ तुला डोकावत असेल
चांदण्या लागतील कुजबुज करु
दवबिंदुंची पाझर होईल सुरु
रातराणी लागेल सुगंध पसरवू
वार्याची झुळूक देईल चाहुल
तुझ्या आगमनाची
पाहुन तुला मी होईन बावरी
राधा झाली होती जशी कृष्णासाठी
तु शोधशील माझ्या नजरेतील प्रिती
ठेवील गुपित नजर माझी झुकली
गारवा करेल आतुर तुला स्पर्शासाठी
मीही असेन बेफान तुझ्या अंधारी गाढ मिठीसाठी.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.