मी म्हटलं चुकून,
मलाही शिकवा हो गाणं.
तर म्हणतात कसे
माझ्या मनातलं बोललीस.
कितीतरी दिवसात
बघ जवार काढली नाही
घरच्या तंबोर्याची.
* * * *
म्हणे,
आधी थोडी नोमथोम
मग
पलटा ताना मुरकी.
तिय्या घेउन येउ समेवर
नंतर
ठेवणीतली अनवट सरगम.
म्हटलं
हात धरून
गाणं शिकवतात का ?
म्हणे,
तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्याची
मोकळी करावी लागते गवसणी.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8174
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणे, तुला
हेच
In reply to म्हणे, तुला by विसोबा खेचर
हं
कुठला अर्थ
विप्रंहून क्रिप्टिक
कविता आवडली.
सहमत आहे
In reply to कविता आवडली. by मुक्तसुनीत
प्रश्न :
In reply to कविता आवडली. by मुक्तसुनीत
कडक!!!!
:-)
मस्त
व्वा!!
वेलेंटाईन
In reply to व्वा!! by पिवळा डांबिस
सुंदर रुपक
खतरनाक!
फार सुंदर . . .
छान
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१ असेच म्हणतो!!
In reply to छान by नंदन
ह्म्म्म
In reply to +१ असेच म्हणतो!! by चतुरंग
जोरदार.. सु
नक्की
लै भारी
In reply to नक्की by विनायक प्रभू
ते रामदास आणि हे रामदास!
वाह!
लाडिक चावट
In reply to वाह! by धनंजय