Skip to main content

प्रतिभा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

प्रवेश द्वार

लेखक दशानन यांनी गुरुवार, 26/03/2009 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
स्थान : रहेजा मॉल, ऑफिसच्या बाहेरील गॅलरीतून काढलेला फोटो. कॅमेरा : सोनी सायबर शॉट अन्य : शटर स्पीड, लेन्स, झुम, सेटिंग, आयएसओ बद्दल काही ही माहीत नाही, फक्त बटण दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे. कलाकुसर : फोटो निळ्यारंगातच आला आहे का माहीत नाही, त्याला वाकडा करुन, फेम चढवली आहे व थोडी रंगसंगती व्यवस्थीत केली आहे, पिकनिक वापरुन.

मनाच्या कुपितले-पाऊस

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 25/03/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची.

शाळा

लेखक जागु यांनी बुधवार, 25/03/2009 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! भिंतीवरचे सुविचार घडवित होते आचार मास्तरांची छडी घाली शिस्तीची घडी पुस्तकातील धडा भरे ज्ञानाचा घडा कवितेचे पठण लावे आयुष्याला वळण शाळेची मधली सुट्टी डब्यासंगे जमे गट्टी सर्वत्र आरडा ओरडा शिक्षेसाठी उठा बशा पिटीचा एक तास मैदानाची पाहे वाट कसरत अन कवायती श्रमाचीही कळे मती जन गण मन ची सुरूवात वंदे मातरमने शेवट संस्कारांची ही देवाण जीवनातील ही ठेवण.
Taxonomy upgrade extras

प्रतिक्षा.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 24/03/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षा.....! प्रतिक्षेत सखे तुझ्या.. कसे मन.. सैरभैर झाले.... ओठांवर मग.. तव विरहाचे.. आर्त गीत उमटले... नकळत होई भास पुन्हा ग... तव स्पर्शाचा क्षणोक्षणी.... मंद चंदनी गंध तुझा मज... लावी पिसे ग.. मनोमनी.. आतुर तव भेटीला नभ.. मृग थेंब बनुनी बिलगले.. ओठांवर मग ....... [१] वाटे मजला सौधामध्ये... असशील बहुधा तु अजुनी... वळूनी बघता होई हसे.. मज चंद्र खुणावे..तो गगनी... त्या बिंबातुन तव प्रतिमेचे... रुप निशी प्रकटले... ओठांवर मग .......[२] रेशीमस्पर्शी मीठीत तुझीया...वाटे मज मी.. स्वर्गी असे.. तुझ्या नि माझ्या प्रीतिचे गे... सुंदर घरकुल मनी वसे.. परि ना कळले..
Taxonomy upgrade extras

जाईची कळी

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/03/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जाईची कळी सायंकाळी उमलली रात्र सुगंधी करण्या काळोखी जागली वार्‍यांच्या मंद झुळकेने लाजली दवबिंदुंच्या स्पर्शाने शहारली चंद्रप्रकाशी पुलकीत झाली रातराणी सखी जाहली पक्षांच्या भुपाळी त डोलली केशरी किरणांच्या कुशीत शिरली अलगद परडीच्या कडेवरून धन्य झाली इश्वरचरणी अर्पुन.
Taxonomy upgrade extras

(...उदरात ढकल काही!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 23/03/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले!