उन्हाळा
उन्हाळ्यात प्रत्येकाच्या तोंडावर रोज एकदातरी ही वाक्य येतातच. "केवढ गरम होतय आज" रोज मध्ये हा आज असतो. "काय उन पडलय कडकडीत", "बाहेर नकोस वाटतय उन्हामुळे", "कधी संपेल हा उन्हाळा ?"
उन्हाळ्याकडे आपण ह्याच दृष्टीने बघतो. तो नकोसा वाटतो. गर्मि ने जीव हैराण होतो. खरच आहे ते. पण ह्यातले आपण फक्त अवगुणच पाहतो. पण ह्यात पण बरेच गुण आहेत. उन्हाळ्यातच मुलांना आणि आपल्याला मार्च एप्रिल पासून सुट्टीचे वेध लागतात. गावाला जायचे, फिरायला जायचे बेत आखायला सुरूवात होते. मे महीना म्हणजे काय मजेला उधाणच. मामाच्या गावाला ह्याच दिवसांत जायला मिळते. शाळेला सुट्टी मिळुन झोपेवरचे, खाण्यावरचे बंधन नाहीसे होते.
मिसळपाव