Skip to main content

तुझे आगमन

तुझे आगमन

लेखक जागु
Published on गुरुवार, 05/03/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
आज तु जेंव्हा येशील सुर्य तुला लाजलेला असेल चंद्र खट्याळ तुला डोकावत असेल चांदण्या लागतील कुजबुज करु दवबिंदुंची पाझर होईल सुरु रातराणी लागेल सुगंध पसरवू वार्‍याची झुळूक देईल चाहुल तुझ्या आगमनाची पाहुन तुला मी होईन बावरी राधा झाली होती जशी कृष्णासाठी तु शोधशील माझ्या नजरेतील प्रिती ठेवील गुपित नजर माझी झुकली गारवा करेल आतुर तुला स्पर्शासाठी मीही असेन बेफान तुझ्या अंधारी गाढ मिठीसाठी.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

याद्या 1288
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तू शोधशील माझ्या नजरेतील प्रिती ठेवील गुपित नजर माझी झुकली मस्त लिहिली आहे कविता. खूप आवडली. क्रान्ति