(शीघ्र कवीच्या तीन वेता!)
"ह्यांच्या धाकाने आमच्यातला कवी मेला!" असं म्हणणारे प्राडॉ जेव्हा तब्बल तीन-तीन कवितांचा नजराणा घेऊन आलेले बघितले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि आम्ही लगोलग मुद्याला हात घातला ;)
कवितेच्या बागेत
कळ्या सजतात
कविता कळ्यांना
स्वतःच्या केसात खोपा करुन माळतेही.
तसा विडंबक आसुसलेला असतो
कळ्यांच्या निवासी खोप्याला,
होतं काय, ओळींतून सुकलेली फुलं पडतात
आणि विडंबक निराश होतो!
दोन
गावंढळासारखी दळता येत नाही
पिठासारखी भसाभस कविता
मुकाट्यानं शांत बसावं
एका जागी, तर तेही नाही
जालावर येतो हायसे
वाटण्याचे क्षण मिळावेत म्हणून,
तर इथेही कवीच्या कविता
अजाण विडंबकाला पकडून तावडीत
ओळीत कोंडून ठेवतात.
अन कल्पना कुरतडतात त्याच्या, सुंदर
आधीच्याच ढिगारभर वेगळ्या कविता असतांना,
उगाच कविता बघतो..याची,त्याची..
अन, वृत्त-यमकाच्या नावाने बोंबलतही बसतो.
खरं तर या अशाच मुक्तकांवर
एखादा प्रोजेक्ट केला असता,
पण आजकाल टीचभर कविताच
वाट्याला येतात साल्या.
तीन
कवी
सारेच कवी कमाल हमाल झालेले,
आंत्रपुच्छ.
एक-दोन-तीन-चार म्हणताच ऍटॅक आणणारे,
एखादाच कवी असतो
झालेला घोळ निस्तरण्यासाठी निघालेला,
विडंबकाला डब्बलबॅरल आणून देणारा!!
चतुरंग
वाचन
2083
प्रतिक्रिया
0