प्रतिभा
सारे काही पहिले
आयुष्यातील काही पहिले क्षण
सुखद अनुभवाचे सारे धन
बाळाचं पहिल पाऊल
मोठेपणाची लागलेली चाहूल
आयुष्यातील पहिला पाऊस
कागदी होडीची केलेली हौस
कडाडलेली पहिली विज
आईच्या मिठीला बिलगलेले काळीज
पहिला दिवस शाळेचा
गंध दरवळणार्या कोर्या पुस्तकांचा
घडलेली पहीली मैत्री
घरापलीकडील ती दृढ नाती
झालेल पहिल दु:ख
रडून रडून मिळालेल सुख
प्रेम पहिल जुळलेल
मन कुठेतरी हरवलेल
प्रेमाचा पहिला स्पर्श
भावनांशी भिडलेला संघर्ष
सारे काही सुखद पहिले
फक्त आठवणीत राहणारे
पुन्हा परत न येणारे.
Taxonomy upgrade extras
जेंव्हा तुझ्या बुटांना ...
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.
पुष्पक यानात भानू आणि पार्वती
पुष्पक यानात भानू आणि पार्वती
पुष्पक यानात भानू आणि पार्वती. मूळ हिंदी लेखक: गोरा चक्रबर्ती, अनुवादकः नरेंद्र गोळे
पहिले सादरीकरणः श्री.अशोक चिटणीस व सौ.शुभा चिटणीस,
१४-१२-२००८ रोजी भवन्स सभागृह अंधेरी येथे.
सार्वजनिक सादरीकरणाच्या अनुमतीसाठी 'मिपाच्या पोस्ट हापिसाचा' उपयोग करून मला पत्र लिहा.
प्रस्तावनाः भानू आणि पार्वती पुष्पक यानात बसलेले आहेत.
गंतव्य स्थळः चंद्र. काही क्षणातच उपग्रह प्रक्षेपण वाहनातून, पुष्पकयान अवकाशात प्रक्षेपित होणार आहे.
थुंबा प्रक्षेपण केंद्रात उलटी मोजणी सुरू झालेली आहे.
दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य ...
निनावी नगर
एक नगर असावं निनावी
तेथे कुणी न राजा न राणी
मानवतेची जात असावी
समानतेची साथ असावी
रुपया नाणी नसो व्यवहारी
असो माणूसकीची देणी घेणी
अनाथ आश्रमे तेथे नसावी
वृद्धाश्रमेही ओस पडावी
कायद्याची वाट नसावी
मंदीराला हाक असावी
एकात्मतेची असो दिवाळी
स्वार्थाची पेटावी होळी
प्रेमाची बरसात असावी
मायेची पालवी फुटावी
पौर्णिमा येथेच खिळावी
अमावस्येला जाग न यावी.
Taxonomy upgrade extras
फुलोरा..(माझ्या चाली सकट)
फ़ुलोरा...
केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली
का उषेच्या उंबर्याशी, रे उभी ओठंगुनी ती??
चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती
अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती
पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा
मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा
मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
- प्राजु
इथे ऐका कृपया न हसता..!
तुझ्या मनात
आले होते सहजच तुझ्या मनात
फेरफटका उगाच मारायला
किती खोल आहे तुझ मन
ते आत डोकावायला
गांगरून गेले आत मी
कुठल्यातरी कोड्यात फसले मी
कोड्यात होती खुप घरं
प्रत्येक घराला वेगवेगळे रंग
प्रत्येक घराला वेगवेगळे रस्ते
मध्येच कुठे कुठे बांधही घातलेले
घर होत प्रतिष्ठेचं, कर्माचं
खुप उंच आणि पसार्याचं
घर होत आत्पेष्टांचं, मैत्रीचं
जिव्हाळा आणि कर्तव्याने भरलेलं
एक होत तुझ्या छंदाच, स्वप्नांचं
सुबक पण कुंपण घातलेलं
एक होत सामाजीक बांधिलकीचं
गोर गरीबांच्या आश्रिवादाचं
त्यातच एक घर माझही होतं
सुंदर, प्रितीने सजवलेलं
प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं
कोड्याचा रस्ता सुटणारं.
Taxonomy upgrade extras
तु !
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र...
************************************
किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?
मिसळपाव