मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बदल

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रोज रोज त्याच दिशा रोज रोज त्याच वाटा दिशांनी पण वाटा थोड्या बदलायला हव्यात. रोज रोज तेच गाव रोज रोज तिच पायवाट वाटेनेही गाव जरा विसरायला हवे. रोज रोज त्याच व्यथा रोज रोज त्याच कथा कथांनीही कधी कधी व्यथांना सावरायला हव. रोज रोज तिच छाया रोज रोज तोच दाह दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव. रोज रोज तेच हसण रोज रोज तेच रडण रडता रडता खुदकन जरा हसायला हव. रोज रोज तिच सकाळ रोज रोज तिच संध्याकाळ संध्याकाळ्नेही थोड सकाळसारख ताज व्हाव. रोज रोज तिच घडण रोज रोज तेच जीवन जीवनातही कधी कधी बदल घडवायला हवा.

वाचने 3927 वाचनखूण प्रतिक्रिया 16

बाकरवडी 20/03/2009 - 13:53
छान आहे कविता आवडली बाकरवडी

सुधीर कांदळकर 20/03/2009 - 13:55
आपल्याला ताजेतवानें करतो. सध्या सोप्या रीतीनें मांडलें आहे. छानच. सुधीर कांदळकर.

दशानन 20/03/2009 - 13:56
सुंदर ! रोज रोज तिच छाया रोज रोज तोच दाह दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव.

सहज 20/03/2009 - 14:55
रोज रोज तिच कविता रोज रोज तेच प्रतिसाद प्रतिसादातही कधी कधी काव्य बसवायला हव. थोडासा बदल चांगलाच!! कविता आवडली बर का जागुजी :-)

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 20/03/2009 - 15:42
ज्यात साधेपणा असावा म्हणजे समजायला अवघड जात नाही, आपणही असेच लिहीत रहावे अशी अपेक्षा (शर्मा कि॑वा बेलवणकर नव्हे.) रोज रोज तेच रडण रडता रडता खुदकन जरा हसायला हव. करणार प्रयत्न करणार सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

सँडी 20/03/2009 - 15:45
सहज सुंदर कविता! अवांतर : ;) रोज रोज तीच झोप रोज रोज तेच उठणं उठुनही परत परत झोपायला हवं. रोज रोज तेच काम रोज रोज तेच ऑफीस ऑफीसातही कधी कधी काम करायला हवं. रोज रोज तेच प्रतिसाद रोज रोज तेच विडंबन प्रतिसादातही विडंबन टाकायलाच हवं.

निशिगंध 20/03/2009 - 15:49
रोज रोज तेच प्रतिसाद रोज रोज तेच विडंबन प्रतिसादातही विडंबन टाकायलाच हवं. छान प्रतिसाद बाकी कविता मात्र मस्त आहे. _______ निशिगंध

क्रान्ति 20/03/2009 - 19:07
मस्तच आहे बदल! खूप मनापासून भावला. रोज रोज तेच काटे रोज रोज तेच सल काट्यांनीही कधीतरी फुलायला हव! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जृंभणश्वान 21/03/2009 - 02:20
मस्त आहे कविता

अनिल हटेला 21/03/2009 - 08:10
आवडली कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जागु 21/03/2009 - 11:56
सहज, सुहास, सँडी, निशिगंध, क्रांती, प्राजु, जृंभणश्वान, अनिल तुमचे खुप खुप धन्यवाद.

विसोबा खेचर 23/03/2009 - 11:02
दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव. व्वा! सुंदर कविता...! तात्या.

चंद्रशेखर महामुनी 23/03/2009 - 13:41
मजा आली ! झकास !

विशाल कुलकर्णी 23/03/2009 - 13:46
छान आहे, आवडेश !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)