(ब्यूटी पार्लर अर्थात काव्यफुफाटा)
सक्काळी सक्काळी मिपावर आलो आणि 'ब्यूटी पार्लर अर्थात यौवन फुफाटा' ही कविता वाचून डोळे भरुन आले! काल भडकमकर मास्तरांनी जालिंदर जलालाबादींची ओळख काय करुन दिली आणि आज ही नवकविता वाचायला काय मिळाली, सगळेच विलक्षण! हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! धन्य आहेस माऊली धन्य आहेस!!
मिसळपाव