Skip to main content

प्रकटन

एक महत्वाची सूचना...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/10/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉमच्या (मिपा) सर्व सभासदांकरता एक महत्वाची सूचना - मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो. असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास ते येथून त्वरीत उडवून लावले जाईल व संबंधित सदस्याचा आयडी व आयपी ऍड्रेस ब्लॉक केला जाईल.

सावली

लेखक राघव यांनी बुधवार, 22/10/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!!
Taxonomy upgrade extras

आठवण

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 19/10/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या स्वर्गवासी पत्निसाठी..... सख्ये तुझ्या आठवणी टच्च डोळ्यामध्ये पाणी एक एक चांदणी ओघळली.... *********** अजूनही तुझी वेणी मी शोधितो गं साजणी आपुल्या शयनी पुन्हा पुन्हा.... ************ कोण खुळा तुला सांगतो..? मी अजुनही एकटाच रहातो.. खोटेच सांगतो... हा बघ एकान्त घेउन उशाला मी रोज झोपतो.. खरे सांगतो... बघ तर येउन .. मी वाट पहातो वाट पहातो..... ***********
Taxonomy upgrade extras

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न : आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! ****************************** यशाकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. - प्राजु (कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

आठवांचा पसारा..

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.. उगा जाहला आठवांचा पसारा खळेना कशा आज डोळ्यांत धारा सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा जरी वादळी घेतली झेप मी ती तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा चला संपला अर्थ या जीवनाचा दिला नीयतीने मला हा इशारा - प्राजु
Taxonomy upgrade extras

निरोप......

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 18/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप...... राहिली न शाश्वती आता कुणाला कुणाची..... कशास मग काळजी करावी जीवाची...... जीवनाच्या वाटा अशा काटेरी झाल्या.... आशा मनीच्या मनातच निमाल्या...... साव ली ही आता वाटे रणरणत्या उन्हा ची कशास मग काळजी करावी जीवाची......... शब्द ही न येती भेटीस आता.... खातो किती म्हणती हा जगाच्या ला ता....... आधीच प्रेत यात्रा निघाली आत्म्या ची...... कशास मग काळजी करावी जीवाची....... अखेर चा निरोप घेईन मी म्हणतो उसन्या आवाजाने मी गुणगुणतो.... न लाज राहिली मज आता जनाची...... कशास मग काळजी करावी जीवाची.......
Taxonomy upgrade extras

गर्भ मंदीर

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 16/10/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
मातेचे गर्भालय पवित्र देवालय शांतीचे आलय कैवल्याच्या मातेच्या गर्भात वात्सल्य व्यवस्था तिथे प्राणप्रतिष्ठा अस्तित्वाची मातेचे गर्भस्थान मंगल तीर्थस्थान आत्म्याचे आधिष्ठान मुर्तिरूप मातेच्या गर्भात अबोध तो बुद्ध जन्मा येता सिद्धार्थ होइ त्याचा..........
Taxonomy upgrade extras

लोच्या झाला रे !!!

लेखक अनिल हटेला यांनी गुरुवार, 16/10/2008 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! चीन मध्ये येउन साधारण ६ महीने झालेत .. आणी हाय हॅलो पूरत चायनीज बोलायला शिकलोत ..(भाषेत आधी पासुनच कच्चा!!) विशेष म्हणजे चीन मध्ये राहुन काम करायच तर तुम्हाला चायनीज (थोडीफार का होइना)यायलाच हवी . नाय तर फारच त्रास होतो ... चायना मेड मालाची निर्यात करणा-या एका फर्म मध्ये क्वालीटी चेक करण्याचे (थोडक्यात पाट्या टाकायचे) महत्त्व पूर्ण काम मी करतो.. आणी कामानिमित्त सारख भटकंती चालू असते ... साधारण पणे प्रत्येक फॅक्टरीत कोण ना कोण ईंग्लीश येणारा (मोस्टली येणारी) असतोच/असतेच ... पण ब-याचदा असा कोणी प्राणी नसेल तर मग आमचा द्वीभाषीक संवाद ऐकून /पाहुन कुणाचीही करमणुक होइन .. २ म

त्रिवेणींची वेणी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/10/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी हा एक अनोखा काव्यप्रकार. चारोळ्या चार ओळींच्या तसे त्रिवेणी, हायकू तीन ओळींचे. त्यातही हायकूतल्या प्रत्येक ओळीतल्या अक्षरांच्या संख्येवर बंधन. कवीश्रेष्ठ गुलजारांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद आंतरजालावर वाचनात आला. 'साखळी हायकू' या आंतरजालीय खेळात सहभागी झालो होतो, तेव्हा त्रिवेणी जवळून पहायला व हाताळायला मिळाल्या.

कॅनव्हास

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 15/10/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.