Skip to main content

निरोप......

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 18/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप...... राहिली न शाश्वती आता कुणाला कुणाची..... कशास मग काळजी करावी जीवाची...... जीवनाच्या वाटा अशा काटेरी झाल्या.... आशा मनीच्या मनातच निमाल्या...... साव ली ही आता वाटे रणरणत्या उन्हा ची कशास मग काळजी करावी जीवाची......... शब्द ही न येती भेटीस आता.... खातो किती म्हणती हा जगाच्या ला ता....... आधीच प्रेत यात्रा निघाली आत्म्या ची...... कशास मग काळजी करावी जीवाची....... अखेर चा निरोप घेईन मी म्हणतो उसन्या आवाजाने मी गुणगुणतो.... न लाज राहिली मज आता जनाची...... कशास मग काळजी करावी जीवाची....... सत्य जपणारे आज उरले न नाते.... बोलता-बोलता फिरते माने वरुन धार-धार पा ते..... नात्यालाही दिली मी आता नावे शस्त्रा ची.... कशास मग काळजी करावी जीवाची.......
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1279
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया