Skip to main content

सावली

लेखक राघव यांनी बुधवार, 22/10/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!! :) भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती, गारवेला गार वारा वाहतो सभोवती, पारिजाता पालवीची आस आहे लागली धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी, गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी, हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली, धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. गाज येई सागराची धुंदल्या तालावरी, बोल सारे रेखणारी लाट होई बावरी, त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली, धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. मुमुक्षु
Taxonomy upgrade extras

वाचने 5405
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी, गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी, हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली, धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. - फार छान कडवे

प्रत्येक ओळ दाद द्यावी अशी आहे. अतिशय सुरेख कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अतिशय सुरेख कविता .. पारिजाता पालवीची आस आहे लागली धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. ..........खूप छान !! गाज येई सागराची धुंदल्या तालावरी, बोल सारे रेखणारी लाट होई बावरी, ...........सुंदर!!

मस्त कविता.... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

+१

कविता आवडली. येथे कोणी चाल बांधणारे आहे का ? चालीत आणखी छान वाटेल :)

एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असे नितांतसुंदर गाणे! :) काय तात्या, घेताय का चाल लावायला? आणि रेकॉर्ड करुन टाका इथे तुमच्या आवाजात! B) चतुरंग

भावना पोह्चली आपली.........