Skip to main content

आठवण

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 19/10/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या स्वर्गवासी पत्निसाठी..... सख्ये तुझ्या आठवणी टच्च डोळ्यामध्ये पाणी एक एक चांदणी ओघळली.... *********** अजूनही तुझी वेणी मी शोधितो गं साजणी आपुल्या शयनी पुन्हा पुन्हा.... ************ कोण खुळा तुला सांगतो..? मी अजुनही एकटाच रहातो.. खोटेच सांगतो... हा बघ एकान्त घेउन उशाला मी रोज झोपतो.. खरे सांगतो... बघ तर येउन .. मी वाट पहातो वाट पहातो..... ***********
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1694
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

भावस्पर्शी कविता, आपला आरंभशूर (|: !!!!!!!.......

काय बोलणार, मन हेलावून टाकलंत.

क्लास आहे . या शब्दातून आठवणींची ईंटेंसिटी कळते आहे. मीनल.