Skip to main content

प्रकटन

हे असं का होतंय?

लेखक सरपंच यांनी बुधवार, 08/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वात आधी आज मिसळपावच्या सेवादात्याच्या खंडीत सेवेमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मिसळपाव तर्फे दिलगिरी व्यक्त करतो. मिसळपाव दिवसागणीक वाढतं आहे. रोज नवीन सदस्य येत आहेत. आणि हजर असणार्‍या सदस्यांची संख्या सुध्दा वाढती आहे. सध्या खर्‍या अर्थाने सक्रिय असणार्‍या सदस्यांच्या संख्येत दुप्पट किंवा तिप्पट सुध्दा वाढ झाली तरी आपला सेवादात पुरून उरेल एवढी क्षमता आहे. मात्र गेले काही दिवस कधीतरी अचानकच भेट देणार्‍या अतिथींची संख्या खूप वाढते. सेवादात्याला झेपणार नाही एवढ्या मागण्या केल्या जातात. हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे. असो.

निरवानिरव

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/10/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
पोस्टर वरच्या तरुण यक्षीणीच्या अप्राप्य , गोलगुबार स्तनांकडे बघत बसलेला भणंग माणूस अचानक हातउसनं मागेल काहीतरी. असाही मी परत येणार नाही. ******* आडगावच्या एका फलाटावर फतकल मारून बसलेल्या म्हातार्‍या बैलासारखं. माझं आयुष्य स्थिरावलं आहे. चिरस्थायी. ************** एव्हाना माझ्या आठवणी. ठेवणीतल्या बुरसट वासासहीत, ट्रंकेच्या तळाशी. घडीघडीत विरलेली घडी. इथेतिथे गंजाच्या लाल डागासहीत. पसरत गेलेल्या आयुष्याच्या मापात कपडे आता अडनिडे. तशी तू समजूतदार हवी असलेली जरीची तार. बंदीस्त केली असशील मनातल्या हुशार रीळावर. दिलंच काही बोहारणीनी विनीमयात तर चार चकचकीत डब्यांची रांग साक्ष देईल, टुकीनी
Taxonomy upgrade extras

धनाढ्य एकवीशी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 07/10/2008 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा) जय धन मान सकळ सुखसागर माया वसत त्रीखंडी निरंतर पैसा पैसा पैसा पैसा दिसतो ऐसा, आहे कैसा? लपविला जर टॅक्सची खासा काळा शार बने मग पैसा भरता सरकाराऽचे देणे शुभ्र धन नांदे अभिमाने हिरवा रंग नोटांचा तुमच्या नयनी दिसे झणी लोकांच्या काळ्या नोटा, दिली सुपारी लाल रंग मग धन ते धारी रंगबिरंगी अती पैसा वरचा परीटाकडून शुभ्र करायचा पैसा अपुला रोड भासतो दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो खोटी नाणी, चपळ फ़िराई तांब्याची मोडीत विकाई पेटीत ठेवून कोऱ्या नोटा तुकडेवाल्या जोडून वाटा पैसा नश्वर, आरोप खोटा! शाश्वत आहे प्लास्टीक नोटा उधारीचा तो पैसा प्लास्टीक जपून ठेवती पैसा बॅन
Taxonomy upgrade extras

बोळे क्लब

लेखक टारझन यांनी रविवार, 05/10/2008 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
बोळे क्लब
डिस्क्लेमर : लेखातील नायक पात्रांची नावे खरी आहेत. मित्रांनो , इथे ऑलरेडी बर्‍याच जणांनी आपल्या मित्रांबद्दल, क्रु बद्दल , परिसराबद्दल लिहीलं असेल. त्यात आमचं पण एक संभाळून घ्या. आणि सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास धाग्यात परवानगी आहे. आदरणीय यम्मी आज्जींच नाव घेऊन सुरूवात करतो. बोळे क्लब म्हणजे जिथे बोळे पार्टीची सुरूवात झाली.का कसं कुठे, कोणी ,इ.इ.

चल मेरी वेस्पा..

लेखक देवदत्त यांनी रविवार, 05/10/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.
जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो. वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती.

काळ थांबला कधीचा...

लेखक राघव यांनी गुरुवार, 02/10/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 02/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या... तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे. आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत. या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा.