ज्याचं त्याचं स्वातंत्र्य
"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही!", "तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस?", "तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला!" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे! आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्यात!
मिसळपाव