Skip to main content

गर्भ मंदीर

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 16/10/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
मातेचे गर्भालय पवित्र देवालय शांतीचे आलय कैवल्याच्या मातेच्या गर्भात वात्सल्य व्यवस्था तिथे प्राणप्रतिष्ठा अस्तित्वाची मातेचे गर्भस्थान मंगल तीर्थस्थान आत्म्याचे आधिष्ठान मुर्तिरूप मातेच्या गर्भात अबोध तो बुद्ध जन्मा येता सिद्धार्थ होइ त्याचा..........
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3240
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मातेच्या गर्भात अबोध तो बुद्ध जन्मा येता सिद्धार्थ होइ त्याचा.......... चांगली कविता. शेवटच्या कडव्याचा अर्थ "जन्माला आल्यावर सगळ्यांनाच जीवनाचा अर्थ सिद्ध होतो" असा तर नसावा? पण मग एक सिद्धार्थ सोडला, तर इतरांसाठी हे कसे लागू होते, ह्यावर कवीचे विश्लेषण कळेल कां?

या कवितेला दाद देण्याकरता माझे शब्द अपुरे आहेत...! आपला, (मातृभक्त) तात्या.

मातेच्या गर्भात वात्सल्य व्यवस्था तिथे प्राणप्रतिष्ठा अस्तित्वाची हे केवळ अप्रतिम, काय कल्पना आहे? व्वा !

यापुढे काही सुचत नाही. अदिती

माता, बालक, वात्सल्य, अधिष्ठान, जन्म हे शब्द/भाव प्रभावी आहेत खरे. पण ४ वेळा मातेचे गर्भालय, मातेच्या गर्भात, मातेचे गर्भस्थान [गर्भ गर्भ गर्भ गर्भ...] ह्या शब्दांमुळे ही कविता मला तरी तितकी भावली नाही. सॉरी. :-(