हॅप्पी चिल्ड्रेन्स डे...
दुपारची वेळ. रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो, आणि गाडीची वाट पाहात फलाटावर थांबलो.
पुढची हकीकत, मी जसं पाहात गेलो, तशीच्या तशी तुम्हाला सांगणार आहे...
...अंधेरीच्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवरचा सहा नंबरचा प्लॅटफॉर्म नेहमीसारखाच गर्दीनं खचाखच भरलेला.
लांबून ट्रेन येताना दिसली, आणि मी मोबाईलवरचं मुलीशी बोलणं आटोपतं घेतलं. आज तिच्या शाळेत "चिल्ड्रेन्स डे' साजरा झाला होता. खूप मजा केली होती मुलींनी. आज शाळेतल्या सगळ्या शिक्षिकांनी मुलींसाठी करमणुकीचे कार्यक्रम केले.
मिसळपाव