मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

देवीला बळी

पॉइंट ब्लँक ·
महाबलीपुरम येथील पल्लवाकालीन गुहेमध्ये कोट्रावै ह्या देवीचं एक शिल्प आहे. हे दुर्गेचं तमिळ रुप मानलं जातं. कधी ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते , म्हणजे ती विष्णुची बहिण म्हणुन विष्णूची आयुधे तिच्याकडे असतात आणि ह्या स्वरुपात ती रेड्याच्या डोक्यावर ती उभी असते. तर कधी तीच्या सोबत सिंह असतो तर कधी काळवीट.

योद्धा' शॉर्टफिल्म स्पर्धा प्रवेशिका अर्ज

हस्तर ·
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त योद्धा @ ८० अजूनी चालतोची वाट डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२० सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/- व या सोबत अजून २० रोख बक्षिसे स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध ! आदरणीय पवारसाहेबांचा झंझावात आपल्या कलाकृतीतून उमटू द्या ! या स्पर्धेत सहभागी व्हा !

गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )

दुर्गविहारी ·
संभाजी राजांचा उदय मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित.

पुन्हा पानिपत!

मनो ·
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

गोव्याचा इतिहास- शिवकाल

दुर्गविहारी ·
काही वर्षापुर्वी मिसळपाव.कॉमवर गोव्याचा इतिहासाची सविस्तर माहिती देणारी नितांत सुंदर मालिका टिम गोवा या आय.डी.ने लिहीली होती.त्याच्या सर्व भागांची एकत्रित लिंक खाली दिलेली आहे. आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा या मालिकेत भाग ५ मध्ये शिवकाल आणि मराठेशाहीविषयी माहिती लिहीली आहे.त्याची लिंक खाली दिलेली आहे. आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही मात्र हि माहिती पुरेशी सविस्तर नसल्याने या कालखंडातील इतिहासावर

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला ·
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

सतीश विष्णू जाधव ·
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)

दुर्गविहारी ·
यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३) भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाट

स्टँनली मिलग्राम ,आज्ञाधारकता आणि मानसशास्त्र

आदित्य कनोजे ·
प्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ स्टँनली मिलग्राम यांनी १९६२ साली एक प्रयोग पूर्णत्वास नेला..जो समाजातील माणुसकीच्या वावराच्या वागणुकीचा एक्स-रे काढणार होता..ह्या प्रयोगाने नुसतं स्टँनली मिलग्रामचच आयुष्य बदललं नाही तर समूह मानसिकतेच्या संशोधनाच्या वाढीस चालना दिली..इतिहासाच्या घटनांना आणि त्यातील पात्रांना समजून घेण्यासाठी ह्या प्रयोगाने राजमार्ग दाखवून दिला. आता जरा प्रयोगाकडे येऊयात म्हणजे एकूण पाश्वभूमी समजून घेता येईल.प्रयोगात दोन व्यक्तींना निवडलं गेल.