Skip to main content

सध्या मी काय पाहतोय ? भाग ३

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 26/03/2021 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्ष मी हिंदूस्थानात चांगले रस्ते असावेत यावर बोललो असेन पण आता देशात चांगले रस्ते, हायवे निर्माण होत आहेत याचा विशेष आनंद आहे. :) आज मा.नितीन गडकरी यांची याच विषयावर असलेली मुलाखत पाहिली आणि देशात रस्त्यांचे काम ते अतिशय भव्यतेने, वेगाने आणि पैशांची बचत देखील करुन करत आहेत हे समजले.

कोरोना लसींची चाचणी

लेखक केदार भिडे यांनी रविवार, 14/03/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ICMR Covid Vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही. kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (misalpav) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत.

करोनाची लस : एक थोतांड

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 01/03/2021 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 21/02/2021 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

आपल्या पैकी कुणाला, थेट शेतकरी वर्गा कडून, शेतमाल खरेदी करायची इच्छा आहे?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 28/01/2021 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/47970 ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे. माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात. काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो. मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन. 1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत. फोन नंबर देतो .... 9405767101 2.

मराठी रेडिओ

लेखक निमिष ध. यांनी सोमवार, 18/01/2021 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी बायडी दररोज मराठी रेडिओ ऐकत असते. तिने नुकतेच एक पेज बनवले आहे ज्यावर महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशन्सच्या लिंक्स आहेत. याचा उपयोग करून अगदी आरामात कुठेही रेडिओ ऐकता येतो. बाकी माहिती खाली तिच्याच शब्दांत वाचा: रूपा धारप देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता. अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती.

स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 07/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
अश्विन महिन्यातील एक प्रसन्न सकाळ उजाडली. नुकताच वर्षाकाळ संपला होता आणि बंगलोर प्रांतीचा सर्वात मोठा सण दसराही थाटामाटात साजरा झाला. बेंगलोरच्या भुईकोटाला आणि शहाजी राजांना बर्‍याच काळांनी स्थैर्य मिळाले होते. वेशीच्या दरवाज्यातून एक ताफा बाहेर पड्ला आणि उत्तरेच्या दिशेने निघाला. या ताफ्यात हत्ती, घोडे,अमात्य, अध्यापक सारेजण होते. दोन मेणेही होते. एका हत्तीवर बारा वर्षाचा एक तरणाबांड तेजस्वी युवक बसला होता. एका मेण्यात त्याच्या मातोश्री तर दुसर्‍या मेण्यात पत्नी होती. हा ताफा होता बेंगलोर प्रांतीचे राजे शहाजी महाराजांची धर्मपत्नी जिजाउ साहेबांचा.

आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 07/01/2021 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध ! marathe ingraj शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजी कोरेगांव येथे इंग्रज आणि मराठे यांचा संग्राम झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशााहिस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरू झाली होती.