Skip to main content

दक्षिण भारतीय मंदिरे

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 24/08/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_ बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/08/2020 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

हरतालिका

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 21/08/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती. कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !

गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 19/08/2020 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.

असा बालगंधर्व पुन्हा न होणे

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/08/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात बालगंधर्व माहिती नसलेला मनुष्य सापडणे जरा कठीणच. बालगंधर्व चित्रपटामुळे त्यांचं कार्य आताच्या पिढीला कळलं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव कलेप्रती असणारी निष्ठा, प्रेक्षकांसाठी उच्च तेच सादर करण्याचा स्वभाव सुद्धा माहिती झाला. त्यांचे असेच काही अपरिचित प्रसंग इथे सादर करतोय.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 21/07/2020 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचू शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ ) चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते.

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 11/07/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti)

लेखक ytallfun@gmail.com यांनी रविवार, 05/07/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण बघणार आहे की गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti), हेचे कारण गुरुची प्रमुख भूमिका भारतात मानली जाते. पण तुम्हाला माहित आहे गुरु पौर्णिमा का साजरा केला जातो? जरी जगभरातील एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला परिष्कृत करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले गेले आहे, परंतु शिक्षण असेल तर भारतात शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे. अशी एक म्हण आहे की केवळ गुरुच आपल्या शिष्याला शर्ममार्गाचे दर्शन देतात.

भाजी घ्या भाजी,स्वतःसाठी ताजी!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 02/07/2020 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो. फळभाज्या 1किलोच्या आत मिळत नाहीत हे खरं आहे. पण पावशेर ते अर्धाकिलोला आपल्या लोकल बाजारातला जो दर पडतो, त्यातच त्या एक किलो येतात आणि फ्रेश येतात.कोलिटी ला 1नंबर! पालेभाज्याही निम्म्या किंवा त्याहून कमी दरात मिळतात.शिवाय ताज्या! मसाला म्हणजे-कोथिंबीर,मिरच्या,आलं,लसूण,कडीपत्ता,लिंबू ,पुदिना हे तर तिप्पट चौपट स्वस्त मिळतं.