Skip to main content

लालपरी काही रम्य आठवणी

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 26/11/2021 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे कृपया सहकार्य करावे - याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का?

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 10/10/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

भारांच्या जगात...५

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 19/08/2021 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं सगळं ठीक होतं भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे. माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/08/2021 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

हिरोशिमाचा स्मृतिदिवस

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 06/08/2021 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली.

क्रेडीट कार्ड

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 31/07/2021 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं. मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे.

असेहि एक विलगीकरण

लेखक shashu यांनी मंगळवार, 13/07/2021 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्‍यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत.

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 05/07/2021 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ? मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या पण सरकारी लोक काय करत असतील ? पगार तर चालूच असणार सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ? पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ? रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का बस सेवा बर्यापैंस्की बंद जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ? पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण