नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ...
मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे.
जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ...
कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते.
आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा.
ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे.