Skip to main content

अमेरिकेतील दहावी बारावी ची वर्षे

लेखक पारुबाई यांनी गुरुवार, 15/07/2010 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
भारतामधील शिक्षण पद्धती ही अमेरिकेतील शिक्षण पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत निराळी आहे.भारतामध्ये ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीची वर्षे आयुष्याला दिशा देतात तशी इथे नववीपासून बारावीपर्यंतची चार वर्षे आयुष्याला दिशा देणारी असतात.अमेरिके मधला विद्यार्थी कोण कोणत्या आघाड्यावर लढत असतो? कशी असतात ही नववी ते बारावी ची चार वर्षे ?

बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 14/07/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली. मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...

लेखक बद्दु यांनी बुधवार, 14/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...आहे का कोणाकडे? क्रुपया लिन्क द्या..आम्च्या मन्डळाच्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी हवे आहेत.. धन्यवाद.

आज जगन्नाथाची रथयात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 13/07/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नंदीघसा तोरा अटकी गला बडसंखठारे किए से भकत एते आपणर डाकिला चंदनपुरे... काळीया रे काळीया रे काळीया रे...
अरे काळ्या, तुझा नंदीघोष (रथ) बड शंखाच्या ठिकाणी अडकून थांबला...असा कोण तुझा भक्त आहे की त्यानं चंदनपुरातून तुला हाक मारली आणि तू तुझा रथ थांबवलास? ओरीसाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक जीवनातील महत्त्वपूर्ण अशी जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होतेय. पुरीतील रथयात्रेचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहू शकता. जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम! (इथे अधिक माहिती यापूर्वी दिली होती.)

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.

जपान चित्रसफ़र - ३ ( कामाकुरा )

लेखक डोमकावळा यांनी बुधवार, 07/07/2010 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर) जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा) उंच इमारती , गजबजलेल्या मेट्रो आणि माणसांची प्रचंड गर्दी असलेल्या टोकियो पासून दूर गेलं की जपानचं बदलतं रूप पहायला मिळतं. उंच इमारतींच्या जागी पसरट टुमदार छोटी छोटी घरं, घरांच्या आजूबाजूला असलेली झाडे असलेलं कामाकुरा हे एक छोटस पण आकर्षक शहर. आणि टोकियो जवळच्या काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक.

अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/07/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला! विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्‍याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते.