Skip to main content

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत..... गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे..... येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे.... पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी.... दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........ तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....

अथ धूमकेतुपुराणं!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 06/08/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो. धूमकेतू म्हटला की आपल्या डोळ्यासमोर 'हॅले'चा धूमकेतू येतो.

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

लेखक गणपा यांनी बुधवार, 04/08/2010 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा. संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय. पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही. जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे. गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो. पायरी १. प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा. येथे पिकासाचे उदाहरण देत आहे.

पुस्तकविश्व

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 03/08/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे ते ना सी फडक्यांचं पुस्तक.. काय बरं नाव त्याचं!! छ्या आता नेमकं लक्षात येत नाहि आहे" "हो रे परवा मला पण युगांतच्या लेखिका पटकन आठवेना. इतकं छान पुस्तक पण काहि केल्या नाव आठवेना" "अरे नेमाड्यांची हि दोन पुस्तकं मी वाचली मस्तच लिहितात. बाकी त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत त्याची यादी मिळते का रे कुठे" "हे पुस्तक मस्त दिसतंय पण महाग आहे. घ्यावं की नाहि कोणी परिचय/परिक्षण लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं" "काय सांगतोस तुला नाहि आवडलं ते पुस्तक. मला तर फार आवडलं.. तु सांग काय नाहि आवडलं?" अश्या प्रकारचे प्रश्न/चर्चा तुम्ही करता की नाहि? आणि बर्‍याचदा प्रश्न हे प्रश्नच रहातात.

विरासत

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 03/08/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

हनी बंचेस ऑफ ओट्स!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 31/07/2010 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. १९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते! पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली.

फर्डिनांड मॅगेलान - जगाचा प्रवासी!

लेखक असुर यांनी शनिवार, 31/07/2010 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करणारा महावीर कोण? या प्रश्नाचा शोध 'फर्डिनांड मॅगेलान'पाशी येऊन संपतो. कारण हाच तो सुपरहिरो ज्याने पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. ती सुद्धा आपण शंकराला प्रदक्षिणा घालतो ना, तशी! या मॅगेलानबद्दल मी पहिल्यांदा वाचलं जेव्हा मी हौशी खगोलनिरीक्षकाचं काम करायचो. दक्षिण गोलार्धातून दिसणारा एक खगोलीय अविष्कार म्हणजे मॅगेलानचे ढग. प्रत्यक्षात ह्या अवकाशातील छोट्या आकाराच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) असून आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरणाऱ्या उप-आकाशगंगा (किंवा लघु-दीर्घिका) आहेत.