Skip to main content

सिंगापुरात वर्षभर ऋतु एकच- उन्हाळा, पण ऋतुगंध किती विविध!

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 11/06/2010 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षभरातल्या विविध ऋतुंचा आनंद सिंगापुरात राहून लुटता येत नाही. वर्षभर एकच ऋतु! उष्ण आणि दमट. अशा वातावरणात राहून ऋतुगंध कल्पनेतच शोधावा लागणार. पण हे काही कठीण नाही! मराठी मातीशी जोडलेल्या कल्पना, लेखन, नाट्य, संगीत आदी कलांची उणीव मराठी प्रेमींना जगाच्या पाठीवर कुठेही भासत नाही. महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)ने ईथल्या मराठी बांधवांना साहित्याशी जवळीक साधायला, मराठीशी आपले नाते घट्ट करायला, ऋतुगंध हे द्वैमासिक काढून एक चांगला अवसर दिला आहे. गेली चार वर्षे हे मासिक नियमित प्रसिद्ध केल्या जाते. ह्यात विविध विषयांवरील लेख, कथा, कविता, प्रवासवर्णने, माहितीपर ईत्यादी लिखाण असते.

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 10/06/2010 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हेरे - गरम पाण्याचे झरे
"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"
सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.

लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 08/06/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
लुई़ज बूर्ज्वा - छायाचित्र - रॉबर्ट मॅपलथॉर्प या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.

मोरोपंतांची आर्या हवी आहे

लेखक शशिधर केळकर यांनी सोमवार, 07/06/2010 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लहानपणी ऐकलेली एक मोरोपंतांची आर्या मला अर्धवट माहीत आहे, आणि नेहेमी मनात रुंजी घालत असते. कोणाला ती पूर्ण येत असेल तर जरूर सांगावे. ती अशी - देवा परमसमर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा, शरण तुला मी आलो, लीन तु़झ्या ठेवितो पदी माथा. तू सागर करुणेचा, देवा ..... पुढे काय? मोरोपंतांची आर्या कुठे वाचता येण्यासारखी आंतरजालावर उपलब्ध आहे का? शशिधर