Skip to main content

माहिती

माहिती — उपयुक्त माहितीपर मराठी लेखांचा संग्रह. तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि दैनंदिन उपयोगाची माहिती मराठीत येथे वाचा.

उल्कावर्षाव!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 20/08/2010 00:33 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणी आपण सगळेच आकाशातली एक 'स्पेशल' गोष्ट पाहून खूप खूष व्हायचो आणि लगेच डोळे बंद करून काहीतरी 'स्पेशल' मागायचो! आठवतंय का काय होती ती स्पेशल घटना? करेक्ट! आपण त्याला म्हणायचो 'तारा तुटला'. तुटणारा तारा ही इतकी विशेष घटना असायची की ते पाहिल्यावर काहीतरी बाप्पाकडे 'विशेष' मागायचं, आणि ते कधी खरं होईल याची वाट पाहत बसायचं. अर्थात असं काही व्हायच्या आधीच अजून एखादा तुटणारा तारा दिसायचा आणि अजून काहीतरी मागणं व्हायचं.

सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.!

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 17/08/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.

सह्याद्री च्या रांगा बघून, त्यांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवून, सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.! सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तामिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी हे होत ! https://www.amazingsahyadri.com/ योगेश ( Yogesh Kardile) यांची ही साइट जरुर पहा !!!

केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 15/08/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

कर्तबगार स्त्री कलाकारांची ओळख करून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न. मागच्या लेखात लुईज़ बूर्ज्वा या खट्याळ, बंडखोर स्त्रीविषयी सांगितलं होतं. यावेळी लुईजच्या अगदी उलट स्वभावाच्या, पण तितक्याच मनस्वी, धाडसी अशा एका स्त्रीची ओळख करून देत आहे.

आत्मचित्र

भाषाभान : पुस्तक परिचय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 15/08/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.

'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत.

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:31 या दिवशी प्रकाशित केले.

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

"शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात.

जगन्याचि कला

लेखक अशक्त यांनी गुरुवार, 12/08/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, https://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E.