Skip to main content

माहिती

माहिती — उपयुक्त माहितीपर मराठी लेखांचा संग्रह. तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि दैनंदिन उपयोगाची माहिती मराठीत येथे वाचा.

मोरोपंतांची आर्या हवी आहे

लेखक शशिधर केळकर यांनी सोमवार, 07/06/2010 19:33 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रहो,
लहानपणी ऐकलेली एक मोरोपंतांची आर्या मला अर्धवट माहीत आहे, आणि नेहेमी मनात रुंजी घालत असते. कोणाला ती पूर्ण येत असेल तर जरूर सांगावे.

ती अशी - देवा परमसमर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा, शरण तुला मी आलो, लीन तु़झ्या ठेवितो पदी माथा. तू सागर करुणेचा, देवा .....

पुढे काय?

मोरोपंतांची आर्या कुठे वाचता येण्यासारखी आंतरजालावर उपलब्ध आहे का?

शशिधर

नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/06/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.

एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.

सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज....

एक प्रचंड अस्वस्थ करणारा लेख

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 28/05/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.

लोकप्रभात आलेला ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा https://www.loksatta.com/lokprabha/20100604/suraksha.htm हा लेख प्रचंड अस्वस्थ करून गेला...त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात तुकडे झाल्यातच जमा आहेत...सुमारे ३ कोटी बांगलादेशी आपल्या देशात आहेत...इस्लामीकरण वाढत आहे त्याचबरोबर भारतविरोधी कारवायाही वाढत आहेत...खरं तर मी असे लेख वाचायचे सोडून दिलेले आहे कारण आपला नुसताच संताप होतो आणि काहीच करता येत नाही हि जाणीव काही केल्या जात नाही...पण चुकून हा लेख वाचला...खरंच इतकी भयानक परिस्थिती आहे?

मधूमेहाविरुद्ध लढा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/05/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

मधूमेहाविरुद्ध लढा

अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले.

मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं.

पाळणाघरातील आजी

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 25/05/2010 04:59 या दिवशी प्रकाशित केले.

कुर्ल्याला राहत होते तेव्हाची गोष्ट...आमच्या बाजूला राहत असलेल्या कुटुंबात एका चिटुकलीची भर पडली...आई बाबा दोघेही नोकरी करणारे...मोठा शाळेत ...हे पिल्लू वर्षाच होण्याच्या आतच नेहरूनगरच्या एका आजींकडे जिथे बिल्डिंगमधील अजून दोन शाळेतील मुली असत तिथेच ठेवायचे ठरले...हि चिटुकली इथे राहू लागली...ऑफिसात जाताना आई-बाबा त्या आजीकडे सोडायचे आणि येताना घेऊन यायचे...दिवसभर हि छकुली तिथेच...