मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजयोग - २२

रातराणी ·
राजयोग - २१ *** नक्षत्ररायचा छत्रमाणिक्य या नावाने मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याच्या खजिन्यामधे फार थोडे धन शिल्लक होते. प्रजेचं सर्वस्व लुटून मुघल सैनिकांना त्यांचा ठरलेला मोबदला देऊन परत पाठवाव लागलं. कठीण दुष्काळ आणि दारिद्र्य सोबत घेऊन छत्रमाणिक्य शासन करू लागला. चारी बाजूंनी फक्त आरोप प्रत्यारोप आणि आक्रोशच ऐकू येऊ लागला.

राजयोग-२१

रातराणी ·
राजयोग - २० *** बिल्वन परत येईपर्यंत राजाने कुकी जमातीच्या सैनिकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी राज्यात मनमानी करायला सुरुवात केली होती. सैनिकांच्या टोळ्या विभागून टाकल्या होत्या. युद्धाची काहीही तयारी केली नव्हती.बिल्वनने परत येताच राजाला अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले. राजा म्हणाला, “ठीक आहे ठाकूर, मी आता निघतो.राज्य, धन हे सर्व नक्षत्रसाठी आहे.” बिल्वन म्हणाला, “असहाय्य लोकांना कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवून तुम्ही पळून जात आहात.

राजयोग - २०

रातराणी ·

अनिंद्य 10/07/2020 - 21:36
छानच. युद्धाची की शिष्टाईची - कोणती बाजू वरचढ होणार ? वाट पाहतोय :-)

राजयोग-१९ *** नक्षत्रराय सैनिकांबरोबर कूच करीत होता, त्याच्या प्रवासात कुठेही अडथळा आला नाही. त्रिपुराच्या प्रत्येक गावात त्याचं राजा म्हणून स्वागत केलं गेलं. जसजसा राजा असण्यातला आनंद क्षणोक्षणी मिळू लागला, तसतशी त्याची तहान अजूनच वाढू लागली. चारी दिशांना पसरलेली शेतं, गावं, डोंगर, नदी सगळं काही माझंच आहे ही भावना वाढू लागली आणि त्याचबरोबर आपण स्वतःही असेच विशाल, शक्तिशाली आहोत असे वाटू लागले. मुघल सैनिकांचा जसा कल असेल, तशाच आज्ञा तो देऊ लागला.

राजयोग-१८

रातराणी ·

टर्मीनेटर 02/07/2020 - 11:42
मध्यंतरी पुढचे भाग येण्यात खंड पडल्याने लिंक तुटली आहे, आता पहिल्यापासून सर्व भाग पुन्हा वाचावे लागणार! पण काही हरकत नाही तुम्ही खूप छान लिहिताय आणि चांगले लेखन पुन्हा पुन्हा वाचण्यातही आनंद मिळतो!

रातराणी 02/07/2020 - 23:38
धन्यवाद अनिंद्य आणि टर्मिनेटर, पुढचा भाग टाकत आहे. अनिंद्य गोविंदमाणिकय, नक्षत्रमाणिकय हे माणिकय राजघराण्यातील त्रिपुराचे खरोखरचे राज्यकर्ते होते, मला वाटतं, त्या कालखंडात घडून गेलेल्या काही घटनांची सांगड घालून गुरुदेव टागोरांनी केलेली ही निर्मिती असावी.

In reply to by रातराणी

अनिंद्य 04/07/2020 - 22:24
राज्यकर्त्यांची नावे खरी आहेत, फक्त कालखंड मागेपुढे केले आहेत असे मला वाटते. बादवे, नामांकित रूपगर्विता जयपुरच्या महाराणी गायत्री देवी ह्याच माणिक्य राजवंशातील एका शाखेतील (कूचबिहार) सुकन्या होत.

राजयोग-१७ *** यावर्षी त्रिपुरामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. उत्तरेकडून उंदरांच्या एकामागे एक टोळ्या त्रिपुराच्या शेतांमध्ये आल्या. सगळी पिकं तर खाल्लीच पण, लोकांनी त्यांच्या घरात जे साठवलं होतं, तेही अन्नधान्य खाऊन टाकलं. बघता बघता दुष्काळ पडला. जंगलात मिळणार्या कंदमुळांवर लोक आपली गुजराण करत होते. जंगलांची तशी कमतरता नव्ह्ती आणि तिथल्या जमिनीत खाण्यायोग्य गोष्टीही मिळत होत्या. शिकार करून आणलेले मांस बाजारात चढ्या भावाने विकले जाऊ लागले.

देव्यपराधक्षमापन स्तोत्र

शाम भागवत ·

Prajakta२१ 24/05/2020 - 23:07
मला आवडते हे स्तोत्र नीट मन लावून हे स्तोत्र म्हणत असताना रडू येते हे चांगले आहे का? बरयाचदा मन एकदम कोरडे करून म्हणण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी एक टिपूस येतोच आत्ता पण गलबलल्यासारखे झालेय तर रडू येऊ नये म्हणून काय करावे? धन्यवाद

In reply to by Prajakta२१

शाम भागवत 24/05/2020 - 23:29
कोणतीही चांगली गोष्ट वाचली की, माझे डोळे तात्काळ भरून येतात. कधी तर धारा लागतात. तिथे मला परमेश्वराचे अस्तित्व जाणवते की काय कोणास ठाऊक?. पण त्यावेळची मनस्थिती माझी खूप आनंददायी व हवीहवीशी असते, लोक काय म्हणतात किंवा हे योग्य का अयोग्य ह्याची चर्चा कोण करत बसताय? मी मस्त पैकी डोळे पुसून, डोळे मिटून घेतो. (बहुधा डोळे अगोदरच मिटलेले असतात) व शांतपणे बसून राहतो. त्यावेळेस अगदी शांत शांत वाटते. मग थोड्या वेळाने पुढचे वाचू शकतो. अंतःकरण शुध्द होत असल्याच्या या खुणा आहत असे मला वाटते. _/\_

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा 25/05/2020 - 12:23
रडू येणे ही अतिहळव्या मनाचे लक्षण आहे ! स्तोत्रातले श्लोक, सिनेमातील विशिष्ट प्रसंग, काही ठराविक लोकांची भेट/दर्शन (उदा. बाबा बाप्पु, आई, अम्मा माताजी वै) या कडे त्रयस्थ त्रटस्थ वृत्तीने पाहिले असता रडू येणे बंद होऊ शकते !

In reply to by Prajakta२१

शाम भागवत 23/06/2020 - 08:09
"आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात." जास्तीचे इथे वाचू शकाल. http://misalpav.com/node/47066

थोड्यावेळाने स्तोत्राच्या अर्थाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मग त्याच साईटवरील अर्थ वाचून काढला. काहीतरी राहतंय, सगळा अर्थ नीट येत नाहीये अशी भावना सारखी मनात येत होती. ही रचना शंकराचार्यांनी नामस्मरणाच्या महती सांगण्यासाठी तर रचलेली नाही ना असं काहीतरी मनात येत होतं.
तुम्ही लिहिलेय म्हणुन माझेही कुतुहल जागे झाले. पण तुम्ही हा प्रश्न अनुत्तरितच ठेवला आहे. अर्थ जाणुन घ्यायची ही सगळी प्रक्रियाच आनंददायक असावी पण हे सर्व झाल्यावर तुम्हाला जे हुडकतो होतो ते सापडले हे फिलिंग आले का?

मनो 24/05/2020 - 23:24
श्लोक १ संबंधित हे आठवलं "I know that I know nothing" is a saying derived from Plato's account of the Greek philosopher Socrates. It is also called the Socratic paradox. The phrase is not one that Socrates himself is ever recorded as saying. This saying is also connected or conflated with the answer to a question Socrates or Chaerephon is said to have posed to the Pythia, the Oracle of Delphi, in which the oracle stated something to the effect of "Socrates is the wisest."

कंजूस 25/05/2020 - 10:17
स्तोत्र आणि आशय आणि उपयुक्तता याबद्दल कळत नाही. शंकराचार्य नावाचे एक आचार्यपद होते. ज्यांना आपण कालडीच्या आठव्या शतकातल्या शंकराचार्यांना 'आद्य' संबोधतो त्याहीपेक्षा अगोदर ते पद होते असा इतिहासकारांचा कयास आहे. 'माझे वय पंच्याऐंशी' हे दुसऱ्या एका शंकराचार्यांचे असावे. चार पीठेसुद्धा अगोदर अस्तित्वात असावीत पण आद्य शंकराचार्यांनी त्यांसाठी तिथल्या राजांकडून अर्थ संपादन केले असावे. चारांपैकी श्रृंगेरी पीठात त्यांची आवडती शारदांबा, आणि शिव मंदिर आहे, तर द्वारका,पुरी , आणि बद्रीनाथास कृष्णावतार आहे. भारतातल्या हिंदू, जैन, आणि बौद्ध या तीन मुख्य धर्मांत १) मृत्यु, २) मृत्युपश्चात जीवन ३) जन्माअगोदर कोण, ४)कर्माचे अस्तित्व आणि वहन, ५) विश्वोत्पत्ती आणि मुख्य ६) देव कल्पना यांवर तत्त्वज्ञान मांडले आहे. कोणत्या पद्धतीवर श्रद्धा ठेवता ती नंयर आवडू लागते, पटू लागते, भले त्याची उकल होवो अथवा न होवो. कारण एकच - जीवाचा जन्म,मृत्यू आणि प्राक्तन अटळ आणि अगम्यच राहिले आहे. --------- शास्त्रार्स्थ चर्चेत/ वादविवादात अमक्याने तमक्यास हरवले म्हणजे काय हेसुद्धा "बरे बाबा, तू म्हणतोस ते खरे, मी हरलो" म्हणत माघार घेणे असावे.

In reply to by कंजूस

शाम भागवत 25/05/2020 - 12:14
कंकाका, तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडले त्याबद्दल धन्यवाद. आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. मग मात्र त्या माणसाला त्या मार्गावर राहण्या व्यतिरिक्त काही करावयाची जरूरी नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. गेली ३० वर्षे देवाचे नाव घेत राहिल्याने माझी वरीलप्रमाणे प्रगती होते आहे तसेच दोष कमी होत आहेत असा अनुभव येत असल्याने मी हा मार्ग धरला आहे. दुसरेही मार्ग असू शकतील यावर माझा विश्वास आहे त्यामुळे त्या दुसऱ्या मार्गांबद्दल मी सहानुभूती बाळगून आहे. मला देवाचे नाव घ्यायला आवडते. ही आवड वाढत असेल तर मी खोलात जातो. अन्यथा चर्चेत भाग घेत नाही. शंकराचार्याचा इतिहास किंवा तुम्ही मांडलेले सहा मुद्दे वगैरे मधे मी रमू शकत नाही किंवा मला लक्षही द्यावेसे वाटत नाही. कारण त्यामुळे माझी आवड जोपासली जाईल असे वाटत नाही. त्या दृष्टिने पाहता मी स्वार्थी आहे असे म्हणता येईल. जोपर्यंत मला माझ्या मार्गात अजून प्रगतीच्या संधी आहेत असे वाटत राहील, किंवा आपल्यात अजून दोष आहेत आणि ते घालवता येऊ शकतात असे वाटत राहील तोपर्यंत तरी जप किंवा नामस्मरण करत राहण्याचा इरादा आहे. नामस्मरणाला आचार्यांनी महत्व दिलेले आहे असे लक्षात आले, म्हणून मी तिकडे ओढला गेलो. त्यावर विचार करू लागलो. या सगळ्यात जपाची माझी आवड वाढली, माझ्या मार्गावरची श्रध्दा दृढ झाली. मी मनापासून सांगतो, हे सगळे मला काहीतरी फायदा होतो आहे म्हणूनच करत होतो. लिहायला लागल्यावर आपल्या विचारात सुसुत्रता येते हे जाणवल्याने लिहीत राहिलो. नामस्मरणाच्या मार्गावरून चालणाऱ्या अन्यांनापण मदत व्हावी म्हणून येथे उतरवले. त्रुटी असतील तर कोणितरी त्या दाखवून देईल व माझे विचार आणखीन प्रगल्भ होतील हा त्यामागचा हेतू आहेच. इथेही माझा स्वार्थच मला कर्म करायला प्रवृत्त करतोय हे नक्की. त्यामुळेच मला कोणी स्वार्थी म्हटले तरी राग येत नाही. पण त्याच बरोबर ह्या मार्गाने जाण्यात काही अर्थ नाही अस कोणी सांगायला लागला तर त्याला “बर“ असे म्हणून बाजूला व्हायचे असते हे आता माहीत झाले आहे. कारण माझा अनुभव मला त्याच्याशी सहमत होऊ देत नाही. तसेच माझाच मार्ग कसा बरोबर आहे हेही मी पटवत बसत नाही कारण माझी ती जबाबदारीच नाहीये. :) “शहाण्याने जगाला सुधरवण्याच्या फंदात पडू नये. जग सुधरवायला आलेली माणसे त्यासाठीच जन्माला आलेली असतात“ या गोंदवलेकर महाराजांच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास असल्याने ती सिमारेषा मी कधी ओलांडत नाही. :) _/\_

In reply to by शाम भागवत

चौथा कोनाडा 25/05/2020 - 12:30
आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे.
ही विधाने आपण खालील तर्‍हेने मांडू शकतो काय ? आपण जी काही कर्त्यव्ये करतो अथवा कामे करतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?

In reply to by चौथा कोनाडा

शाम भागवत 25/05/2020 - 13:07
हो मांडू शकता. बरोबरच आहे ते. फक्त मला या पध्दतीने वागायला आवडते म्हणून मी तसे वागतो हा भाव पाहिजे. मी या पध्दतीने वागतो म्हणून मी कोणीतरी विशेष आहे असा अभिमान वाटला नाही पाहिजे. अन्यथा वादावादीला, भांडणाला वगैरेला सुरवात होते. मी तरी हे पथ्य सांभाळतो आणि त्याचा मला खूप फायदा झालाय. मात्र
ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?
यावर चर्चा केल्याने माझ्या नामस्मरणाच्या मार्गावरील वाटचालीला फायदा संभवत नसल्याने माझा पास. _/\_

In reply to by शाम भागवत

धार्मिकता म्हणजे व्यक्तिगत धारणा किंवा श्रद्धा. वास्तविकात सर्व अस्तित्व एक आहे आणि ते अंतर्बाह्य पोकळ आहे. थोडक्यात, कुणाच्या आत कुणीही नाही. तस्मात, आपण आनंदात असलो की आपल्या कोणत्याही कृत्यातून दुसर्‍याला दुखावण्याची शक्यता शून्य. त्यामुळे दुसरा दुखावला गेला की नाही यापेक्षा आपण आनंदी आहोत का हे पाहणं श्रेयस.

लेखन आणि मांडणी सुसूत्र झाली आहे. तुमची मेहेनत कौतुकास्पद आहे. माझ्या प्रतिसादांचा तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता नाही कारण गेली ३ दशकं तुमचा जप चालू आहे. त्यामुळे प्रतिसाद अशांसाठी आहे ज्यांना या फंदाची व्यर्थता जाणून घ्यायची आहे आणि त्यात पडायचे नाही. _____________________________________________ > "आचार्य आपली चूक कबूल करताहेत. ते आपला पश्चाताप व्यक्त करत आहेत. ही चूक मी परत कधी करणार नाही असा निश्चय व्यक्त करत आहेत. आणखीन वरच्या स्थितीला जाण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. पण हे सगळे समजून घेतले नाही तर मात्र हे स्तोत्र नकारात्मक वाटू शकते." हा सगळ्या खटाटोपामागचा फंडा आहे, __________________________________________ पण ते अयोग्य आहे कारण १. देव ही मानवी कल्पना आहे. मानवाच्या मेंदूशिवाय इतर कुठेही त्या कल्पनेचं अस्तित्व नाही. २. अशा काल्पनिक गोष्टीचं नाम न घेणं हा अपराध होत नाही. शिवाय मुळात देव हीच कल्पना आहे त्यामुळे नामाभिधान पण काल्पनिक आहे. "जय शंभो" न म्हटल्यानं अफ्रिकनाला अपराध वाटणार नाही आणि "भंभो मोगँबो" न म्हटल्याचा आपल्याला पश्चात्ताप होणार नाही. ३. आदीम गोष्ट शांतता आहे, ती अनिर्मित आहे आणि तेच आपलं स्वरुप आहे. ४. जेवढा जप किंवा कोणत्याही ध्वनीचा नाद साधक करतो तेवढी शांतता हेच आपलं स्वरुप आहे हे समजण्याची शक्यता दुरावते. ५. त्यात पुन्हा जपाची भानगड अपराधभावाशी जोडली गेली तर साधकाला परतीचा मार्ग अशक्य होतो.

सर्वप्रथम , श्याम भागवत जी , सादर नमस्कार वि.वि. अतिषय सविस्तर आणि सुंदर लेखाबद्दम मनःपुर्वक धन्यवाद ! आचार्यांच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक अत्यंत आवडते स्तोत्र आहे . पांडुरंगाष्टक, आत्मषटक कौपीनपंचक ही उत्तम स्तोत्रे ! हरिमीडे आणि दक्षिणामुर्ती स्तोत्रे अजुनही डोक्यावरुन जातात , ( किन्व्वा त्यावर विचार करावा इतका वेळ अजुनतरी मिळालेला नाही . ) बाकी ह्यास्तोत्रातील कित्येक श्लोकांवर वाद विवाद करता येईल पण आता कोणत्याच प्रकारचे वादसंवाद करण्यात रस राहिलेला नाही. सर्वच जण समान अध्यात्मिक पातळीला किंव्वा बौधीक पातळीला नसतात. शिवाय लोकांचे ब्रिंगिग अप ही इतक्या भिन्न भिन्न पातळीला झालेले असते की अगदी समान बौधिक पातळी असली तरीही समान गोष्टींचा समान अनुभव उपभोगणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा आपण कोणालाच काहीच सांगण्याच्या फंडात न पडणे हेच उत्तम . आपण आपल्याला जो काही अर्थ लागेल त्यातुन जो काही अनुभव येईल त्याचा आनंद उपभोगु. ( अवांतरः हा प्रतिसाद ही त्याच प्रक्कारातला आहे. हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये ! :) ) ह्या स्तोत्रातील "पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:" हा श्लोक मला अत्यंत आवडतो, डोळ्यात पाणी ये कधी कधी . कधीकधी स्वतःच्या "विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी " आई ह्या लेकराचा त्याग करणं तुला शोभणारं नाही कारण एकवेळ पोरगं वाईट असु शकतं पण आई कशी वाईट असेल" हा श्लोक फार म्हणजे फारच करुण रसाचा अगदी अर्क काढल्यासारखा वाटतो. आणि हा एक श्लोक फार अप्रतिम आहे "चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो". ह्या श्लोकाचा अर्थ ज्ञनेश्वर माऊलींच्या अमृतानुभवातील काही श्लोकांसोबत वाचुन पाहिला की एकदम भारी वाटतं - जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥ जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥ माया , शक्ती आहे ह्या विचारामुळे, कल्पनेमुळे आपण शिवत्वाचा अनुभव घेऊ शकतो , तो आनंद उपभोगु शकतो , इरव्ही अरुप अशा शिवा बद्दल काय बोलणार. आपण जे जगदीश वगैरे म्हणतो ते मायेमुळे, जर देवी, शक्ती, मायाच नसेल तर कसले आले जग अन कसले आले ईशत्व ! अहाहा !! असो. पुन्हःएकदा अप्रतिम लेखाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद ! उपासकासी सुचना | उपासना उपासना ||

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 25/05/2020 - 14:47
धन्यवाद. _/\_ अमृतानुभवातील ओव्या पण आवडल्या.
हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये !
खर आहे. यामुळे लोकांतात असूनही वाहून जायला होत नाही.
"विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी "
काहीतरी मिळवण्यासाठी सगळे जग धावत असते. पण मिळवण्यापेक्षा लाभणे महत्वाचे असते. लाभणार नसेल तर मिळवलेले त्रासदायक ठरण्याचीच शक्यता जास्त असते. हे एकदा लक्षात आले की मग आपला हव्यास कमी कमीच होत जातो. आणि सगळे जीवन सोपे होऊन जाते. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by प्रसाद गोडबोले

जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी । किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥ ______________________________________ पहिल्या तीन ओळीतून काही मार्गदर्शक तत्व नसलं तरी चौथी ओळ दिशादर्शक म्हणता येईल > केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ___________________________________ माणसाचं सर्व जग त्याच्या मेंदूपलिकडे कुठेही नाही. तस्मात, कोणताही एक ध्वनी (उदा. हं‌म्‍ ऽऽऽ), डोळे मिटून, शांतपणे आणि एकसंधतेनं उच्चारला तर त्याने संपूर्ण मेंदू व्याप्त होतो. ते "केलें जगायेव्हढें लेणें" करायला पुरेसं आहे. त्यानी ब्रेन सेल्सपण रिचार्ज होतात आणि यथावकाश शांततापण लाभते. त्यासाठी कोणत्याही नामसाधनेची गरज नाही आणि अपराधभावाची तर बिल्कुल नाही.

कंजूस 25/05/2020 - 15:59
शाम भागवत, संक्षी आणि प्रगो?/मार्कस ओरेलिअस तिघांचीही विषय मांडणी संयमित आणि सुसुत्र असते. मला आवडते. बाकी कुणी एखादे तत्त्वज्ञान किंवा नित्यनियम गेली बरीच वर्षे आचरणात ठेवले असतील तर 'त्रुटी' वगैरेंचा अजिबात करू नये.

In reply to by कंजूस

शाम भागवत 25/05/2020 - 17:12
इथे त्रुटी म्हणजे लेखातील त्रुटी असा अर्थ ‍अभिप्रेत आहे. लेखातील त्या त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल असे मला म्हणायचे आहे. नामस्मरणातील त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल यासाठी मी लेख लिहिलेलाच नाही. :) कारण ज्याला जपाचा अनुभव नाही तो जप कसा काम करतो हे जाणूच शकणार नाही. झानेश्वर माउली तर म्हणतात की, तेथिल प्रमाण नेणवे वेदांसी। तें जीवजंतूंसी केवी कळे ॥॥

In reply to by शाम भागवत

तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर शोधा शांतता ही अनिर्मित स्थिती की नाम हा मानव निर्मित टिपी ! नक्की काय साधायचंय ?

In reply to by शाम भागवत

फार वेळ चालू शकत नाही. कारण मग तुम्ही केलेल्या लेखन सायासाचा कुणालाही उपयोग होणार नाही. पब्लिक फोरमवर जेंव्हा आपण व्यक्त होतो तेंव्हा एकतर आपल्याकडे संबंधित विषयाची सर्व उत्तरं हवीत. किंवा मग उत्तर नाही असं सांगायचा प्रामाणिकपणा हवा.

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 25/05/2020 - 18:06
अहो, नामस्मरणाची महती सांगण्यासाठी मी लेख लिहिलेलाच नाहीये. आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन. पण नामस्मरणांत काही अर्थ नाहीये हे तुम्हाला मांडायचे आहे. ती तुमची जरूरी आहे. ती तुम्ही मांडत रहा. मी कुठे हरकत घेतलीय. नामस्मरणाने लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय अशी माझी समजूत आहे. जालावरचे लोक सूज्ञ आहेत. काय घ्यायचे व काय नाही हे ठरवायला ते सक्षम असताना त्यांची काळजी मी का करू. मी तरी माझे लेखन त्यांना फायद्याचे ठरेल किंवा नाही याबाबत कोणतेही विधान करू इच्छीत नाही. थोडक्यांत नामस्मरणाचा कसा उपयोग नाही हे मांडण्याचा तुमचा अजेंडा आहे. तुम्ही तुमचे विचार मांडत रहा. मी वाचत राहीन. तुमचे विचार वाचायला मला तरी काही प्राॅब्लेम नाही. _/\_

> आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन. या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

> या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ? कारण यावरून ३ गोष्टी स्पष्ट होतील १. ज्या देवीकडे क्षमायाचना केली जातेयं ती मुळात आहे का ? थोडक्यात, साधकाच्या कल्पनेपालिकडे तिला अस्तित्व आहे का ? २. नाम न घेतल्यानं नक्की काय अपराध झालायं? ३. अपराधाचं क्षमापन देवी नक्की केंव्हा आणि कसं करते ? तुमचा प्रतिसाद या मार्गावर चालणाऱ्यांना उपयोगी होईल किंवा मग तो मार्ग सोडून मुक्तपणे जगायला उपयोगी होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शाम भागवत 29/05/2020 - 11:15
कोणाला तरी उपयोग होईल किंवा कोणाला तरी वाचवता येईल हा तुमचा अजेंडा आहे. तो तुम्ही स्वबळावर पूर्ण करावा. या स्तोत्राबद्दल मला जे वाटते ते मी लिहिले आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहा. वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जे काही पाहिजे असेल तेवढे ते घेतीलच. तुमचे सर्व विचार हे नेहमीच वस्तुनिष्ठ असतात हे मिपावर जगजाहीर आहे हे मला कालच खरडपट्टीवर कळलेले असल्याने, तुम्ही काही लिहिले की त्यावर काहीही लिहावयाचे नसते हे आता माझ्या लक्षात आलेले आहे. यास्तव, तुमच्यासाठी हा शेवटचा प्रतिसाद. _/\_

Jayant Naik 07/06/2020 - 08:04
तुमचे विवेचन मनाला खूप भावले. मुळात शंकराचार्य हे ब्रम्ह फक्त सत्य आहे आणि सारे जग मिथ्या आहे असे म्हणणारे . पण शेवटी शेवटी ते सुद्धा भज गोविन्दम ..मूढ मते असे लिहून गेले आहेत. आणि या स्तोत्रात तर त्यांनी मातेची आळवणी अतिशय आर्त पणे केली आहे. तुम्ही ते अतिशय सुंदर प्रकारे उलगडून दाखवले आहे. आपले अतिशय आभार. भज गोविन्दम वर सुद्धा काही लिहिता आले तर अवश्य लिहा.

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्
अनुक्रमणिका
प्रस्तावना लेखामागचे गृहीतक श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४

जगज्जेता [भावानुवाद - शतशब्दकथा]

मूकवाचक ·

पाठीमागे वळून न बघण्याची तसदी देखील न घेता तिने दरवाजाला चक्क लाथ घातली
बाहेर उघडणारा दरवाजा आहे का ? शक्यतो सगळे दरवाजे आत उघडतात...

सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती.

द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)

ए ए वाघमारे ·

एमी 08/01/2019 - 22:14
छान झालाय तुम्ही केलेला अनुवाद. मिपावरच आधी कोणीतरी केला आहे का या कथेचा अनुवाद? मी ही कथा मराठीतून मराठी आंजवरच वाचली आहे असे वाटतेय.

टर्मीनेटर 09/01/2019 - 12:53
मस्त कथा, अनुवादही छान केलाय. एडगर ॲलन पो च्याच 'काळी मांजर' ह्या जयंत कुलकर्णी साहेबांच्या अनुवादित कथेची आठवण आली. तुमची अनुवाद करण्याची शैली आवडली, पुढील लेखनास शुभेच्छा!

The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍! ‘ती’ कल्पना माझ्या डोक्यात प्रथम कधी व कशी आली ते सांगणं अवघड आहे.

शवविच्छेदन...... भाग - ४

जयंत कुलकर्णी ·

टर्मीनेटर 03/01/2019 - 13:23
छान अनुवाद केला आहे तुम्ही कुलकर्णी साहेब. कथा थोडी अपुर्ण वाटली, अर्थात मुळ कथाच अशी आणि एवढीच असेल तर नाईलाजच आहे म्हणा. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने ह्या कथेचा आणखीन विस्तार करावा अशी नम्र विनंती.

प्रचेतस 04/01/2019 - 09:18
उत्कृष्ट कथा. अर्थात टर्मिनेटर म्हणतात तसे कथा काहीशी अपूर्ण वाटली. शेवट वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिल्यासारखा वाटला. शव पळवून आणणं आणि शवविच्छेदनं ह्यावरुन मेरी शेलीची अभिजात 'फ्रॅन्केनस्टाइन' आठवली.

शवविच्छेदन...... भाग - १ शवविच्छेदन...... भाग - २ शवविच्छेदन...... भाग - ३ ....जी साठ वर्षाची म्हातारी मेली होती ती एका बाटलेल्या जमिनदाराची बायको होती. अर्थात त्या गावातील जमिनदाराची ! म्हणजे फार काही श्रीमंत नव्हती पण ते कुटुंब खाऊनपिऊन सुखी होते. घरी गाई म्हशी होत्या आणि ती शरीराने चांगली सुदृढ होती. तिने आयुष्यभर विजापूरला जाऊन गोलघुमट पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते पण तेही तिला शक्य झाले नव्हते.

शवविच्छेदन...... भाग - ३

जयंत कुलकर्णी ·

टर्मीनेटर 29/12/2018 - 10:44
मस्त चालू आहे मालिका, अनुवाद वाचतोय असे कुठेच जाणवत नाहीये. प्रत्येक भागागणिक उत्सुकता वाढत आहे, लवकर येउद्यात पुढचे भाग!

शवविच्छेदन...... भाग - १ शवविच्छेदन...... भाग - २ ....ती दुपार अशीच गेली. संध्याकाळी पाटलांनी - त्या माणसाचे नाव रवि पाटील होते, त्या दोघांना हॉटेलमधे जंगी मेजवानी दिली. गंमत म्हणजे मद्यपान, जेवण झाल्यावर पाटलांनी डॉ. मानकाम्यांना हॉटेलचे बील चुकते करायला सांगितले. ते बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता. पाटील जवळजवळ झिंगले होते आणि डॉ. मानकामे बील भरायला लागल्यामुळे चडफडत दात ओठ खात होता. डिसुझालाही मद्य हळुहळु चढत होते. त्याच मद्यधुंद अवस्थेत डिसुझा घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी डॉ.

शवविच्छेदन...... भाग - २

जयंत कुलकर्णी ·
शवविच्छेदन...... भाग - १ ......तरुणपणी डिसुझा विजापूरच्या मेडिकल कॉलेजमधे शिकत होता. ते कॉलेज आता मी जे प्रकरण सांगणार आहे त्या प्रकरणामुळेच बंद पडले. असो. कुठलीही गोष्ट पटकन शिकणे हे डिसुझाच्या रक्तातच होते. त्याच्याकडे अजून एक दैवी देणगी होती ती म्हणजे एकदा कुठली गोष्ट ऐकली की ती त्याच्य सदैव लक्षात राहायची आणि तो या देणग्यांचा यथोचित उपयोग करत असे. त्याला घरी काम करावे लागतच नसे पण कॉलेजमधे तो त्याच्या शिक्षकांची भाषणे अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आणि विद्वत्तापूर्ण शंका विचारायचा.