भाषांतर
मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १७-१८
दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.मोबियस १७ तेवढ्यात विवराच्या कडेला पंख फडकताना जसा आवाज येतो तसा आवाज झाला.
मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२
त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला.
मोबियस प्रकरणे ९-१०
सावलीतून एकदम उन्हात आल्यावर तो पायापासून वर वितळू लागल्याचा त्याला भास झाला. पण त्याच्या गाभ्यामधे बर्फाची एखादी लादी असल्यासारखा तो अजून पूर्ण वितळत नव्हता. त्याला एकंदरीत परिस्थितीची लाज वाटली. एक जनावरासारखी बाई, जी फक्त आजचा विचार करतेय, कालचा नाही उद्याचा नाही.जणू काही तिच्या ह्रदयाच्या जागी फक्त एक बिंदू आहे.
मोबियस प्रकरणे ७-८
ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती. डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते.
मिसळपाव