Skip to main content

भाषांतर

राजयोग - २२

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २१ *** नक्षत्ररायचा छत्रमाणिक्य या नावाने मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याच्या खजिन्यामधे फार थोडे धन शिल्लक होते. प्रजेचं सर्वस्व लुटून मुघल सैनिकांना त्यांचा ठरलेला मोबदला देऊन परत पाठवाव लागलं. कठीण दुष्काळ आणि दारिद्र्य सोबत घेऊन छत्रमाणिक्य शासन करू लागला. चारी बाजूंनी फक्त आरोप प्रत्यारोप आणि आक्रोशच ऐकू येऊ लागला.

राजयोग-२१

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 17/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २० *** बिल्वन परत येईपर्यंत राजाने कुकी जमातीच्या सैनिकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी राज्यात मनमानी करायला सुरुवात केली होती. सैनिकांच्या टोळ्या विभागून टाकल्या होत्या. युद्धाची काहीही तयारी केली नव्हती.बिल्वनने परत येताच राजाला अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले. राजा म्हणाला, “ठीक आहे ठाकूर, मी आता निघतो.राज्य, धन हे सर्व नक्षत्रसाठी आहे.” बिल्वन म्हणाला, “असहाय्य लोकांना कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवून तुम्ही पळून जात आहात.

राजयोग - २०

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१९ *** नक्षत्रराय सैनिकांबरोबर कूच करीत होता, त्याच्या प्रवासात कुठेही अडथळा आला नाही. त्रिपुराच्या प्रत्येक गावात त्याचं राजा म्हणून स्वागत केलं गेलं. जसजसा राजा असण्यातला आनंद क्षणोक्षणी मिळू लागला, तसतशी त्याची तहान अजूनच वाढू लागली. चारी दिशांना पसरलेली शेतं, गावं, डोंगर, नदी सगळं काही माझंच आहे ही भावना वाढू लागली आणि त्याचबरोबर आपण स्वतःही असेच विशाल, शक्तिशाली आहोत असे वाटू लागले. मुघल सैनिकांचा जसा कल असेल, तशाच आज्ञा तो देऊ लागला.

राजयोग-१८

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 26/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१७ *** यावर्षी त्रिपुरामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. उत्तरेकडून उंदरांच्या एकामागे एक टोळ्या त्रिपुराच्या शेतांमध्ये आल्या. सगळी पिकं तर खाल्लीच पण, लोकांनी त्यांच्या घरात जे साठवलं होतं, तेही अन्नधान्य खाऊन टाकलं. बघता बघता दुष्काळ पडला. जंगलात मिळणार्या कंदमुळांवर लोक आपली गुजराण करत होते. जंगलांची तशी कमतरता नव्ह्ती आणि तिथल्या जमिनीत खाण्यायोग्य गोष्टीही मिळत होत्या. शिकार करून आणलेले मांस बाजारात चढ्या भावाने विकले जाऊ लागले.

जगज्जेता [भावानुवाद - शतशब्दकथा]

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 24/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती.

द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)

लेखक ए ए वाघमारे यांनी रविवार, 06/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍! ‘ती’ कल्पना माझ्या डोक्यात प्रथम कधी व कशी आली ते सांगणं अवघड आहे.

शवविच्छेदन...... भाग - ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 03/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
शवविच्छेदन...... भाग - १ शवविच्छेदन...... भाग - २ शवविच्छेदन...... भाग - ३ ....जी साठ वर्षाची म्हातारी मेली होती ती एका बाटलेल्या जमिनदाराची बायको होती. अर्थात त्या गावातील जमिनदाराची ! म्हणजे फार काही श्रीमंत नव्हती पण ते कुटुंब खाऊनपिऊन सुखी होते. घरी गाई म्हशी होत्या आणि ती शरीराने चांगली सुदृढ होती. तिने आयुष्यभर विजापूरला जाऊन गोलघुमट पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते पण तेही तिला शक्य झाले नव्हते.

शवविच्छेदन...... भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/12/2018 या दिवशी प्रकाशित केले.
शवविच्छेदन...... भाग - १ शवविच्छेदन...... भाग - २ ....ती दुपार अशीच गेली. संध्याकाळी पाटलांनी - त्या माणसाचे नाव रवि पाटील होते, त्या दोघांना हॉटेलमधे जंगी मेजवानी दिली. गंमत म्हणजे मद्यपान, जेवण झाल्यावर पाटलांनी डॉ. मानकाम्यांना हॉटेलचे बील चुकते करायला सांगितले. ते बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता. पाटील जवळजवळ झिंगले होते आणि डॉ. मानकामे बील भरायला लागल्यामुळे चडफडत दात ओठ खात होता. डिसुझालाही मद्य हळुहळु चढत होते. त्याच मद्यधुंद अवस्थेत डिसुझा घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी डॉ.

शवविच्छेदन...... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 22/12/2018 या दिवशी प्रकाशित केले.
शवविच्छेदन...... भाग - १ ......तरुणपणी डिसुझा विजापूरच्या मेडिकल कॉलेजमधे शिकत होता. ते कॉलेज आता मी जे प्रकरण सांगणार आहे त्या प्रकरणामुळेच बंद पडले. असो. कुठलीही गोष्ट पटकन शिकणे हे डिसुझाच्या रक्तातच होते. त्याच्याकडे अजून एक दैवी देणगी होती ती म्हणजे एकदा कुठली गोष्ट ऐकली की ती त्याच्य सदैव लक्षात राहायची आणि तो या देणग्यांचा यथोचित उपयोग करत असे. त्याला घरी काम करावे लागतच नसे पण कॉलेजमधे तो त्याच्या शिक्षकांची भाषणे अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आणि विद्वत्तापूर्ण शंका विचारायचा.