मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषांतर

नामकरण.. (एक प्रेमकथा - भाग १ )

दिपक लोखंडे ·
गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा.. ..................................................... अहो ऐकलत का?.. तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे... कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?.. अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही.. विसरला का तुम्ही? आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी.. अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो.. .......................................................... - २० मिनिटानंतर... (गाडीमध्ये सागर व त्याची बायको..) सागर.. तुम्हाला काही विचारु का? काय गं, यात परवानगी कसली घ्यायची..

बाळा, उरले तुजपुरती......

अनन्त्_यात्री ·
कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय... सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने.

श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १

aanandinee ·
श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ हरिः ॐ अध्याय १, भाग १. भावार्थ- नेहमी केल्या जाणार्या या गणेशवंदनेतसुद्धा हेमाडपंतांचे सद्भक्त असणे उठून दिसून येते. त्यांनी केवळ गणपतीला वंदन केले नाही तर गणपतीमध्येच त्यांनी त्यांच्या सद्गुरू साईनाथांना पाहिले. हिंदू धर्मात आपल्या अनेक वेगवेगळ्या देवता, त्यांचे वेगवेगळे सण , साजरे सर्व काही केले जाते पण मग त्यामध्ये कधीकधी "आपली निष्ठा नक्की कुठे आहे? मग बाकीच्या गोष्टी मानायला हव्यातच का ? बाकीच्या देवांना नमस्कार करायलाच हवा का? न केला तर काही होईल का?

अंदाजे-गालिब

मिडास ·
शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ.

मोबियस : भाग-३ : प्रकरणे ३१-३२ व मोबियस भाग :४ प्रकरण ३३ समाप्त.

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
...ते बघून तिलाही हसू आवरेना. त्याच्या डोक्यात एकमेकांना जोडलेल्या असंख्य खड्ड्यांचे जंजाळ आकार घेत होते. पण तिला मात्र ते त्याचे उत्तेजन वाटत होते. अर्थात हे सगळे नैसर्गिकच होते..

मोबियस भाग-३ : प्रकरणे २९-३०

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
“झाडच आणायचे असेल तर पिंपळाचे आणूयात. त्याच्या पानांची सळसळ कानाला बरी वाटते.” पानांची सळसळ, फांद्यांपासून मुक्त होण्याची निष्फळ धडपड. त्याच्या भावनांचे बंधन झुगारुन त्याचा श्वास मंद चालत होता. त्याला रडू फुटले.

मोबियस भाग २ प्रकरण - २७ व भाग-३ प्रकरण २८

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
....एकलेपणा म्हणजे आभासाची आस, या पलिकडे काय असते ?
मोबियस २७ दोराला बांधून एखादे पोते सोडावे तसे त्याला परत विवरात सोडण्यात आले. एकही जण एकही शब्द बोलत नव्हता. एखादी शवपेटी खड्ड्यात उतरवताना असते, साधारण तसे वातावरण होते म्हणाना! विवर खोल व अंधारे होते.

मोबियस भाग -२ : प्रकरणे- २५-२६

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
....हंऽऽऽऽ रेडिओ आणि आरसा, आरसा आणि रेडिओ. जणूकाही सारे आयुष्याचे सार फक्त या दोन शब्दात सामावले आहे. या दोन्ही वस्तूत एक साम्य आहे बरं का. या दोन्ही वस्तू दोन माणसातील दुवा हो़ऊ शकतात. कदाचित आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यात असलेली लालसा या वस्तू परावर्तित करत असतील किंवा प्रक्षेपित करत असतील. ठीक आहे!

मोबियस भाग -२ : प्रकरणे २३-२४

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
...तो गुणगुणताना त्याच्या टीव्हीचा आवाज इतका मोठा करतो की ज्यांचे आयुष्यवस्त्र उसवले आहे त्यांचा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. एक धागा सुखाचा शंभर धागे.... हे गाणे या जगात खितपत पडलेल्या मनुष्यजातीचे गाणे आहे....

मोबियस भाग -२ : प्रकरणे २१-२२

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
तेवढ्यात एक कावळा काव काव करत उडाला. डोळ्यासमोरचा रंग पिवळ्यातून निळा झाला आणि त्याच्या वेदना हळूवारपणे त्या आसमंतात विलीन झाल्या. चार कावळे खालून किनार्‍याला समांतर उडत होते. त्यांच्या उन्हात चमकणार्‍या कडा गडद हिरव्या भासत होत्या. त्याने त्याला त्याच्याकडे असलेल्या किटकबाटलीतील पोटॅशियम सायनाईडची आठवण झाली.