मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषांतर

शवविच्छेदन...

जयंत कुलकर्णी ·
प्रिय ओंकार, जिथे असशील तेथे तू आनंदात असशील याची मला खात्री आहे... मी शक्यतो कोणाला अरे तुरे करत नाही पण आपल्यात जो काही पत्रव्यवहार झाला फ्रॅन्झ काफ्काबद्दल, त्याचा धागा धरुन तुला एकेरी हाक मारतोय. (अणि शिवाय वाढलेल्या वयाचा थोडास गैरफायदाही घेतोय !) तुझ्यासाठी एक युद्धकथाच लिहायचे मनात होते पण सध्या Caliphateचा इतिहास लिहित असल्यामुळे त्यात व्यस्त आहे. तुलाही हे सांगितले होतेच... असो पण ही एक छोटी कथा तुझ्यासाठी लिहित आहे.... तुला आवडेल अशी आशा आहे... पुढेमागे एक युद्धकथाही लिहिनच.. आपला, जयंत कुलकर्णी शवविच्छेदन दररोज संध्याकाळी आम्ही ‘‘पारिजात’’मधे जमायचो.

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड!

निमिष सोनार ·
प्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच "माध्यमांतर" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे!!

बाहेरची भानगड

साहना ·
गोव्यांत External Affairs मिनिस्ट्री ह्या शब्दाचे भाषांतर भायल्या भानगडीचो मंत्री असे केले जाते. विनोद सोडून द्या. मिपा वर हार प्रकारच्या विषयावर लोक धुळवड उडवत असतात. काही दिवस आधी मी एक परिसंवाद ऐकायला गेले होते तिथे एक महिला "affairs expert" म्हणून अली होती आणि तिने त्या विषयावर पुस्तक सुद्धा लिहिले होते. लग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती म्हणून मी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भांत मिपा वरील जाणकार आणि एक्स्पर्ट लोकांसाठी काही प्रश्न . (अर्थानं आमच्या मित्राचे असे झाले हो ... म्हणून सुद्धा तुम्ही ऐकीव गोष्टी इथे चिकटवू शकता) १.

माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...

जयंत कुलकर्णी ·
नमस्कार ! मी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे. १महा-अभियोग : द् ट्रायल मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग.

स्टिकीन

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire स्टिकीन १८८०च्या उन्हाळ्यात मी एका निमुळत्या कनूमधून फोर्ट रँगेलहून निघालो. मला वायव्य अलास्काच्या बर्फाळ प्रदेशाची पाहणी पूर्ण करायची होती. १८७९च्या हिवाळ्यात मला ही भटकंती अर्धवट सोडावी लागली होती. सगळे सामान, म्हणजे फार काही नाही, ब्लँकेट इ.इ. बोटीत चढल्यावर माझ्या इंडियन सोबत्यांचा निरोप समारंभ सुरु झाला.

मा.का.

जयंत कुलकर्णी ·
Simple, Free Image and File Hosting at MediaFire स्थळ : श्रीनगर येथील गफार खान यांचे फार्म हाऊस ऋतू : थंडीचा साल : १९६० पोस्टकार्डाचे दिवस होते. पहिले पोस्टकार्ड आले ते घाटीवरुन. त्यावर एका डोंगराचे सुंदर चित्र होते. पूर्वी अशा प्रकारची पोस्टकार्ड पाठविण्याची पद्धत होती हे तुम्हाला आठवत असेल. कार्डावर एकच ओळ सुवाच्च अक्षरात लिहिली होती ‘‘मला वाटतं तुम्हाला हे चित्र आवडेल म्हणून पाठवत आहे.

मराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)

शशिधर केळकर ·
मुलखावेगळी ‘पैज’ मूळ कथा - ॲन्टन चेकोव (१८६०-१९०४) १ रात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली. आलेल्या पाहुण्यांमधे कोणी उच्चविद्याविभूषित होते, काही पत्रकार होते, आणि बहुतेकांचा कल फाशीची शिक्षा नसावी याकडे होता.

कबुलीजबाब ... एका ज्ञानियाचा! (भावानुवाद)

मूकवाचक ·
ज्याने आपल्या आंतरिक चिदानंद अस्तित्वाची असीम ब्रह्माशी असलेल्या एकतानतेची प्रचिती घेतली; अशा ज्ञानियासाठी पुनर्जन्म, कुठलेही स्थित्यंतर आणि बंधमुक्ती संभवत नाहीत. तो या सगळ्यांच्या पलीकडे असतो. तो आपल्या सर्वार्थाने परिपूर्ण अशा सच्चिदानंद मूळस्वरूपात अविचलपणे स्थित झालेला असतो. त्या पुढील वाटचालीत स्वतःचा देह आणि बाह्य जगताचा आभासी स्वरूपात येणारा प्रत्यय ज्ञानियाला पूर्णपणे नष्ट करता येत नसला तरी (आत्मस्वरूपापासून विचलीत होण्याइतके) हे मृगजळ त्याला कदापी चकवा देउ शकत नाही.

निवडुंग तरारे इथला....

अनन्त्_यात्री ·
In Flander's Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते. ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद.