सामान्यत: सामान्य स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या सौंदर्यामुळेच पुरुषांना त्यांची किंमत कळू शकते. हा दुर्दैवी व भाबडा भास आहे. या भ्रामक समजुतीनेच त्या पुरुषाच्या अध्यात्मिक बलात्काराला बळी पडत असाव्यात.
मोबियस
१९
घोड्याला टाच मारुन त्याला पिटाळता येते पण काळाला टाच मारता येत नाही.
दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.
मोबियस
१७
तेवढ्यात विवराच्या कडेला पंख फडकताना जसा आवाज येतो तसा आवाज झाला.
.....पण त्या डोळ्यात त्याला अपरंपार वेदना दिसल्या पण तिरस्कार व कडवटपणा मात्र बिलकूल नव्हता. ती कशाची तरी याचना करते आहे असे त्याला वाटले.
अशक्य! त्याला भास झाला असणार. डोळ्यातील भावना हा एक भाषेचा अलंकार आहे. बुबुळाचा आणि भावनांचा काय संबंध?
ते त्याने केलेही असते सहन. पण तेवढ्यात त्या विवराच्या कडेने निळसर प्रकाश आत घरंगळत आला आणि सगळे चित्र बदलले. जसा एखादा स्पंज पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे झोप त्याला आकर्षित करु लागली आणि तो झोप येऊ नये म्हणून झोपेशी झगडू लागला. हे चक्र कुठेतरी भेदायलाच हवे होते.
त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला.
सावलीतून एकदम उन्हात आल्यावर तो पायापासून वर वितळू लागल्याचा त्याला भास झाला. पण त्याच्या गाभ्यामधे बर्फाची एखादी लादी असल्यासारखा तो अजून पूर्ण वितळत नव्हता. त्याला एकंदरीत परिस्थितीची लाज वाटली. एक जनावरासारखी बाई, जी फक्त आजचा विचार करतेय, कालचा नाही उद्याचा नाही.जणू काही तिच्या ह्रदयाच्या जागी फक्त एक बिंदू आहे.
ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती.
डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते.
ही वाळू अशीच वर्षभर इकडे तिकडे हलत असते. हा प्रवाहच तिचा प्राण असतो. ती कधीच थांबत नाही. कुठेच! पाण्यात असो किंवा हवेत, ती आपली वहातच असते. सामान्य जीव वाळूत तग धरु शकत नाही. आणि हे जंतूंनाही लागू आहे...
बघावी तिकडे वाळू! त्याच्या मनात विचार आला, ‘छे! ही वाहणारी वाळू काही जीवनासाठी आवश्यक आहे असे वाटत नाही. पण स्थिरता ही आयुष्यासाठी आवश्यकच आहे असेही नाही. जर सगळेच वाहत्या वाळूसारखे वाहत्या जीवनात सामिल झाले तर या जगात स्पर्धाच उरणार नाही.