Skip to main content

भाषांतर

द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)

लेखक वहाटूळ यांनी शनिवार, 28/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं.

रेडइंडियन मुलांच्या कथा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 28/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ... मिशोमिस सुरु करतो... ऐका रे मुलांनोऽऽऽ चार शिकारी भाऊ होते.

शेकोटी...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 24/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेकोटी... ...दिवस उजाडलाच तो गोठलेला. आकाशात मळभ दाटलेला. थंडी मी म्हणत होती आणि आकाशाचा उदासपणा छातीत धडकी भरवीत होता. युकॉनच्या मुख्य रस्त्यापासून तो आत वळला. पायवाटेने चढ चढल्यावर त्याला एक पूर्वेकडे जाणारी आडवाट लागणार होती. दमछाक कराणारा तो चढ चढून गेल्यावर त्याने घड्याळात बघण्याच्या निमित्ताने थोडा दम घेतला. सकाळचे नऊ वाजले. आकाशात सूर्य नव्हता.

आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.

दिशा : फ्रान्झ काफ्का

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 28/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा : मूळ कथा फ्रान्झ काफ्का अगदी छोटीशी असलेली गोष्ट काफ्का ने १९१७ ते १९२३ दरम्यान लिहिली गेल्याचं मानलं जातं, पण काफ्का जिवंत असतांना हि प्रकाशित होऊ शकली नाही. काफ्काच्या मृत्यूपश्चात १९३१ साली The Great Wall of China (German: Beim Bau der Chinesischen Mauer) या कथासंग्रहात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. ------------------------------------------------------------------------------------------------------------ "हे जग दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे." दुःखी चेहऱ्याने उंदीर म्हणाला. आधी तर हे जग किती मोठं होतं, तेव्हा मला खूप भीती वाटायची.

कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 27/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको! (हा ले़ख नुकताच ईसकाळच्या पैलतीर या सदरात प्रकाशित झाला आहे) (वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते. या लेखातील बरेच मुद्दे मला न पटणारे आहेत व ते वाचून मला आश्‍चर्यही वाटले.

मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 22/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
 मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ___________________________________________________________________ जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले. दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले.

मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 21/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
 बेखबरी का फायदा मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ------------------------------------------------------------------------------------------- खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली. खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला. थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला : बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली. तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं. तिसऱ्यांदा खटका दबला.

काळरात्र (भाग ५) आयझँक असीमोव्ह

लेखक विचित्रा यांनी सोमवार, 21/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
शीरीनने आपलं बोलणं सुरु ठेवलं. " जेव्हा आपले अवकाशसंशोधक लगाशग्रहाच्या भ्रमणकक्षेचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कि या कक्षेवर दुसर्या अवकाशवस्तूचा प्रभाव पडतोय. पण हा अवकाशगोल लगाशसारखाच प्रकाशरहित असल्यामुळे, नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही." " लगाशभोवती फिरणार्या त्या गोलाला चंद्र म्हणतात, हे माहित आहे सगळ्यांना." " बरोबर. तर, हा चंद्र एका विशिष्ट वेळी, बरोबर बीटा सुर्याच्या रेषेत येतो.त्याच्या सावलीमुळे बीटा तारा पूर्णपणे झाकला जातो. याचवेळी इतर सूर्य विरुद्ध गोलार्द्धात असल्यामुळे लगाशवरच्या विशिष्ट भागात संपूर्ण अंधार पसरतो." " ग्रहण म्हणतात त्याला.

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 17/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१ पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) ‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला..... "ॲना !