***************************
आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. आणि मग टी. व्ही. वर झळकत होत्या मान्यवराच्या प्रतिक्रिया, दाभोलकरांनी दिलेल्या मुलाखती आणि इतर चित्रण विविध न्यूज चॅनेल दाखवत होते.