Skip to main content

बातमी

एका सुंदर उपक्रमाची आणि जबरदस्त मोहीमेची दखल!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 23/08/2017 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार. एका जबरदस्त मोहीमेची आणि एका सुंदर उपक्रमाची माहिती आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली. एखादी व्यक्ती आपली आवड, पॅशन, छंद ह्यामधून किती सुंदर काम उभं करू शकतो आणि त्याही पलीकडे इतरांना किती मोठी प्रेरणा देऊ शकतो, ह्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांना हर्षद पेंडसे हे नाव ओळखीचं असेल. हर्षदजी ९ सप्टेंबर रोजी लेह- खर्दुंगला येथे होणा-या खर्दुंगला चॅलेंज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. खर्दुंग- खर्दुंगला- लेह ही ५००० मीटर्स पेक्षा जास्त उंचीवरची ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि त्यात ते सहभाग घेत आहेत!!!

चायना आणि चुंबी १

लेखक माहितगार यांनी रविवार, 02/07/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
ठिंबक टू ! शेजार्‍यांशी सोहार्दाचे आदर्शाचे गोडवे अधिक पण दोन शेजारी एकमेकांशी शांततेत जगतील हे वास्तवात कमी दिसत असलं तरी, किमान ब्रिटीश पूर्व काळात हिमालयाची भिंत त्यामागची काही हजार वर्षे शांततेत जावीत एवढी उंच नक्कीच होती. जगाच्या सर्व जागा काबीज करण्यासाठी ब्रिटीश गलबत आणि खलबत यशस्वी होताना भारताच्या सीमा कुठे पर्यंत असाव्यात याचे निर्णयही ब्रिटीशांनीच घेतले. भारताच्या फाळणीची अप्रत्यक्ष जबादारी जशी त्यांच्या गळ्यात जाते, भारत एकसंघ असतानाच्या सीमांच्या अधिकतम विस्ताराच श्रेयही त्यांनाच जात.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 02/06/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती

रीमा लागूू . . . . भावपूर्ण श्रध्दांजली !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 18/05/2017 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रीमा लागू यांचे हृदयविकाराने निधन . . . . अनपेक्षित . . अचानक . . . या बातमीनं त्यांच्या एक से बढकर एक भूमिका डोळ्यासमोर येत आहेत . . . . नाटक ,चित्रपट, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडणारी अष्टपैलू अभिनेत्री आता आपल्याला परत दिसणार नाही याचं मनापासून वाईट वाटतं आहे . . . . विनोदी ,गंभीर, कारुण्यपूर्ण अशा कुठल्याही भूमिकेसाठी ती नेहमीच योग्य होती . . . . नावातच "मा"असल्याने आईची भूमिका तिने यथायोग्य वठवली . . . . . "माझं घर माझा संसार" मधली तिची वास्तवाजवळ जाणारी भूमिका दुसऱ्या कुणालाही शोभून दिसली नसती . . .

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 10/05/2017 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा. १. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१) २. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६) आपलाच, मुवि

"जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/05/2017 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी "जलजीवा" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात. 2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे.

एका पाकिस्तानी गाढवाची किंमत..

लेखक माहितगार यांनी शनिवार, 29/04/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही काही वेगळ्या रुपकाच्या अर्थाने धागा लेख उघडला असेल तर अंमळ चुकला आहात. हि पाकिस्तानच्या प्रसिद्ध अंग्रेजी दैनिक डॉननेच दिलेली बातमी आहे. तुम्ही म्हणाल कि असते एकेका प्राण्याला किंमत, तशीच असेल पाकिस्तानी गाढवालाही किंमत, त्यात विशेष ते काय ? विशेष बाब अशी कि पाकिस्तानी गाढवांच्या किंमतीची चर्चा सिंधच्या विधानसभेत झाली, आणि चर्चेचा उद्देश्य तसा किंमत नव्हताच मुळी ४७०० गाढवांची त्यांच्या पोलीसांना म्हणे कातडी मिळाली जी कुणी चिनी व्यापारी चीनला घेऊन जाणार होता. म्हणजे नेहमीचाच व्यापार होणार होता तर यात सिंधी विधानसभेत चर्चा होण्यासारखे काय मोठे ?