Skip to main content

असेच काहितरी सुचलेले

लेखक राजू यांनी गुरुवार, 28/07/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा. थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा. कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्या

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/07/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे या दोन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते.

मी आर्ची बोलत्येय.

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 28/07/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

लेखक सुंड्या यांनी गुरुवार, 28/07/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं- उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब, चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है, तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब मै कब डूबुंगा फिक्र किया करते है, कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब... “वा वाह!!.....गजब” -मी “जियो क्या ब

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/07/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे.

बावरे प्रेम हे - एक दिव्यपट

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 26/07/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/07/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता.

निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण

लेखक Anand More यांनी सोमवार, 25/07/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो.

‪निर्गुणी भजने‬ (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 22/07/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता.

निर्गुणी भजने‬ (भाग २.१) - सुनता है गुरु ग्यानी

लेखक Anand More यांनी गुरुवार, 21/07/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे निर्गुणी भजनांची सिरीज सुरू केली होती, पण तेंव्हा मनमेघ यांनी देखील त्याच विषयावर आणि वेगवेगळ्या निर्गुणी भजनांवर माझ्या आधी सिरीज सुरू केली होती. त्यामुळे मी थांबलो. नंतर इथे पोस्ट करायचे राहूनच गेले. 'आता आमोद सुनांस जाले' वर परवा लिहिलं तेंव्हा आठवलं की मिपावर निर्गुणी भजनेची सिरीज टाकायची राहून गेली आहे. मग इथे ती सिरीज टाकायच्या विचाराने उचल खाल्ली. जरी ही सिरीज आठ भागांची असली तरी यात वेगवेगळी भजने नसून एकाच भजनासोबत मी केलेली मुशाफिरी आहे. आज जेंव्हा मी हे वाचतो तेव्हा मला जाणवते की मी लिहिताना अनेक ठिकाणी पसरट झालेलो आहे. पण ते कुठे एडिट करू ते कळण्याइतपत समज मला आलेली नाही.